मकरसंक्रात
मकरसंक्रातीच्या देतो आज
तुम्हांला खूप खूप शुभेच्छा
पूर्ण होवो तुमच्या
मनातील सर्व इच्छा
तिळ तिळने बनतो
लाडू छान छान
गोड शब्दाने बनते
नातं महान
गुळाने चिकट राहतो
एक एक तिळ
विश्वासाचे नाते बनायला
लागतो मात्र वेळ
तिळगूळ प्रेमाने एकमेकांना
आजच्या दिवशी द्यावा
एकमेकांवरचा जुना नवा राग
कायमचा मिटवून टाकावा
आज सूर्याचा होतो
मकर राशीत प्रवेश
आपलेही जीवन व्हावे
इतरांसाठी नेहमी आदर्श
आजपासून बोलावे सर्वांशी
आदर व प्रेमाने
हसून स्वागत करावे
एकमेकांचे आनंदाने
गुळासारखा लवचिकपणा
आपल्या स्वभावात यावा
आपला इतरांना नेहमीच
आधार वाटत रहावा
गूळ म्हणजे प्रेमळ शब्द
तिळ म्हणजे मित्रमंडळी व नातलग मोठं
गुळासारखे चिकटून करावे
आपसातले नाते घट्ट
तिळ अन् गुळाचा गोडवा
यावा आपल्या शब्दांमध्ये
शब्द उच्चारताच आनंद फुलावा
सतत दुसर्याच्या मनामध्ये
संक्रांत यावी आपल्याला
चिकटलेल्या दुर्गुणांवर
घेऊन जावे तिने
त्यांना खूप दूरवर
देवरे सर
Comments
Post a Comment