Skip to main content

खरी संपती

खरी संपती
आज माणूस जो तो संपती कमविण्याच्या मागे लागला आहे .पैसा कुठून कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो आहे .कुणी किराणा मालाचे दुकान टाकतात, कुणी खते बियाणे यांचा व्यवसाय, कुणी विविध मालाचे दुकान टाकतात, कुणी हाॅटेल टाकतात, कुणी व्यवसाय करतात, कुणी नोकरी करतात असे अनेक प्रकारे कुणी प्रामाणिकपणे पैसे कमवितात तर कुणी दुसर्‍याला लुबाडून पैसे कमवितात .कुणाकडे प्रचंड पैसा आहे. कुणाकडे घरे आहेत जमिनजुमला आहे पण हे सर्व करत असतांना खर्‍या संपतीकडे माणसाचे लक्षच नाही .पैसा कमविण्याच्या नादात वेळेवर जेवण नाही, विश्रांती नाही, पुरेशी झोप नाही त्यामुळे काहींचे वजन भरपूर वाढले ,काहींना वजनच नाही. काहीचे पोट सुटले. काहींना पोटच नाही अशामूळे काहींना उठता येत नाही. उभे राहता येत ना. मांडी घालून बसता येत नाही .चालतांना धाप लागते. blood pressure साठी गोळ्या खाव्या लागतात .पचन होत नाही म्हणून औषधे खावे लागतात .बॅंकेत भरपूर पैसा आहे व तो कमविण्याच्या नादातच असे सर्व रोग पाठीमागे लागलेत .कधी हार्ट फेल होईल सांगता येत नाही. कधी कोणता झटका येईल सांगता येत नाही .जो पैसा कमविला जी संपती कमविली ती जागीच राहणार व माणूस सर्व सोडून ऐन उमेदीत निघून जाणार मग त्या संपतीचा काय उपयोग? जर ती उपभोगण्यासाठी माणूसच राहिला नाही .म्हणून शरीर हिच संपती आहे जेवढ्या गरजा आहेत तेवढा पैसा हवा, कुणाकडे मागायची गरज नसावी एवढा पैसा हवा पण तो कमवितांना आरोग्याची हेळसांड होणार नाही हे बघावे.वेळेवर सकस आहार, पुरेशी झोप,  चालणे, योगाप्राणायाम करणे ,वजन समतोल ठेवणे हे बरेच आपल्या हाती आहे .काळीवेळा सर्व समतोल असतांनाही माणूस अचानक जातो याचे कारण परमेश्वरालाच माहीत व असे उदाहरण पुढे करुन आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. आपल्या हाती आपले आरोग्य नक्कीच आहे व निरोगी राहून गरजेपुरता पैसा असणे हिच खरी संपती आहे बाकी जादा पैसा , जादा वजन ,कमी पैसा, कमी वजन हे रोगांचे मुळ कारण आहे म्हणून हे मूळच उपटुन टाकले वेळेवर तर बरेच प्रश्न सुटतील .घरात एक व्यक्ती आजारी असला तर संपूर्ण घर आजारी असते .
           काही प्रश्न न कळत घडत असतात.उदा.बाथरुममध्ये पाय घसरुन पडणे, रस्त्यात चालतांना वाहनाची धडक बसणे ,काही जड वस्तू उचलतांना कंबर मोडणे किंवा लचक येणे .झोपतांना मानेखाली उंच काही घेतले तर मान अडकणे ,बसमध्ये ,ट्रेनमध्ये चढतांना उतरतांना पाय घसरणे व हाताला , डोक्याला इजा होणे, व्यसन लावून घेणे व रोगांना आमंत्रण देणे,अनैतिक गोष्टी करणे ,मशिनमध्ये हात अडकणे ,दुसर्‍याकडून घेतलेला पैसा परत न करणे ,चोरी करणे ,आपल्याच लोकांशी दुश्मनी करणे ,बाई व बाटली यांच्या नादी लागणे,असलेल्या पदाचा गैरवापर करणे,नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुबाडणे किंवा नोकरीसाठी, व्यवसायासाठी घरजमीन विकून किंवा व्याजाने काढून पैसे भरणे अशा अनेक  गोष्टीतून मोठ्या समस्या येऊ शकतात व जीव गमवायची किंवा नोकरी गमवायची वेळ येऊ शकते म्हणून सावधगिरीने सर्व गोष्टी केल्यात तर अनेक समस्यातून आपला बचाव होऊ  शकतो .काहीवेळा वाहन हाती आले की विमान समजून चालवणे व ते कंट्रोलच्या बाहेर गेले की मग स्वत:चा व इतरांचा जीव जाणे तसेच भांडणे उकरून काढणे संपतीवरुन किंवा इतर गोष्टींवरुन मग पोलीस चौकीत फेर्‍या मारणे ,कोर्टकचेर्‍या यांच्या कचाट्यात सापडणे म्हणजे नको ते उद्योग पाठीमागे लावून घेणे व मनस्ताप करुन आयुष्य कमी करुन घेणे त्यामुळे मनाचा मोठेपणा ठेऊन इतरांना व स्वत:ला माफ करुन आयुष्य सरळ मार्गाने जगावे .ज्यादिवशी कोणतेही व्यसन न करता शांत झोप लागेल त्यादिवशी समजावे की आपण चांगले काम केलेले आहे व आपले आरोग्य चांगले आहे .बघा पटतं का?

Comments

  1. चांगले विचार मांडले आहेत. पण प्रत्येकाचा चॉइस असतो किंवा असहायता असते, जीवन जगण्याच्या पद्धतीची.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...