जीवन एक खेळ
जेव्हा ठरवतो कुठे जायचे
येतो अचानक अडथळा
सर्व नियोजन डळमळते
कितीही पाळली वेळा
आपण केव्हा कुठे असू
हे आपल्याला सांगता येत नाही
आलेल्या परिस्थितीशी हतबल होऊन
त्यातून बाहेर पडायला होत नाही
नियोजित कामावर नाही जाता आले
तर संताप भरतो मनी
काय ठरवले व काय झाले
हे सांगायला नसते कुणी
मनासारखे नाही झाले
तरी मन शांत ठेवावे
मौन धारण करुन
परिस्थितीवर मात करायचे ठरवावे
काहीतरी आपल्याकडून चांगले घडावे
यासाठी देवाने केला आजचा दिवस बहाल
त्यामुळे दु:खी कष्टी न होता
मनात रचावा आनंदाचा महाल
दुसरा दिवस काय घेऊन येणार
हे आपल्याला नसते माहीत
गर्व अहंकार न बाळगता
आतून रहावे नेहमी शांत
ठरवलेले काम नाही झाले
तरी करु नये आपण त्रागा
कुणाच्या तरी मनासारखे होत आहे
हे सांगतो तुमचा हितचिंतक दगा
चांगले बोलता येत नसेल
तर वाईट शब्द नको तोंडी
आपल्यालाच होतो त्रास
कारण वेगात चालते आपली नाडी
नकारात्मक विचार करण्याने
माणसाच्या ह्रदयावर येतो दाब
धडधाकट दिसणार्या माणसाच्या ह्रदयाला
देव म्हणतो आता थांब
घरदार जमीन जुमला यासाठी
चढू नये कोर्टाची कधी पायरी
प्रत्येक दिवशी जीवन चालले सरत
म्हणून वेळ वाया नको कुणाच्या दारी
जे चालले आहे तो आहे देवाचा खेळ
आपल्याला खेळाडू बनवून
खेळाचे नियम लक्षात घेता
दाखवावा चांगला खेळ करुन
विश्वासू माणसाने धोका दिला
तरी झोप नाही उडावी
खेळाचाच होता एक भाग
असे समजून ती घटना विसरुन जावी
चांगला खेळ खेळलो
म्हणून घेईल तो पुढच्या खेळात
आपल्यावर खुश होऊन
घालेल चांगल्या जन्मात
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment