Skip to main content

आहे व होता

आहे व होता

आहे म्हणजे वर्तमानकाळ
जीवंत असल्याचा पुरावा
होता म्हणजे भूतकाळ
आता नसल्याचा सांगावा

जीवन म्हणजे काय
आहे व होता यातील अंतर
काहींचे अंतर संपते न कळायच्या आधी
तर काहींचे संपत नाही लवकर

आहेत असतात कामाच्या धावपळी
कधीच न थांबणार्‍या
होतात सर्व संपते
काहीच खर्‍या नसणार्‍या

हे सांगता येत नाही
आहेचे कधी होईल होता
आहे मध्ये करावे चांगले काम
कुणाचाही बदला न घेता

आहे म्हणजे असतो
इतरांना भक्कम आधार
होता म्हणजे करतो
बाकींना कायमचे निराधार

आहेमध्ये नसते माणसाला
देत कुणी किंमत
होता मध्ये जाणवते
इतरांना त्याची किंमत

आहे जोपर्यंत शिल्लक आहे
तोपर्यंत आनंदी रहावे
होता मध्ये माहीत नसते
पुढे काय होत असावे

आहे मध्ये क्षणभर लोभासाठी
होता मध्ये होऊ नये रुपांतर
विचारपूर्वक पाऊल उचलून
लोभापासून रहावे कायमचे दूर

आहे मध्ये असतो आपला परिवार
सर्व सुखदु:खामध्ये वाटेकरी
होतामध्ये नसतो कुणी
आपल्याजवळ एका देवापरी

देवरे सर

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...