विज्ञान दिवस विज्ञान दिवसाच्या देतो लाख लाख शुभेच्छा विज्ञानाची प्रगती होत राहो अशी करतो मनापासुन इच्छा विज्ञानामुळे झाले माणसाचे जीवन फार सूखकर एका क्षणात करतो संपर्क मग कितीही असेल कुणी दूर हवा पाणी अन्न मिळते विज्ञानामुळे चांगले रात्रंदिवस असतो उजेड विज्ञानाने केले भले आकाशात मारतो भरारी फिनिक्स पक्षासारखी अंतराळातही माणूस राहतो परिस्थिती निर्माण करतो स्वर्गासारखी विज्ञानामुळे घरबसल्या माणूस करतो आॅफिसचे सर्व कामं एका बटनावर करतो सर्व जबाबदार्या तमाम विज्ञानामुळे कळतो माणसाला झाला कोणता आजार वेळेत औषधपाणी घेतल्याने आजार पळतो दूर विज्ञानामुळे आधीच कळतात निसर्गाच्या होणार्या घडामोडी माणूस होतो त्यामुळे सावध वाचतात होणार्या तोडाफोडी पाऊस ,चक्रीवादळे याचा बांधता येतो अंदाज माणूस घेतो आधीच खबरदारी विज्ञानामुळे कळले असते राज ज्ञानाची कक्षा विज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात विस्तारली गुगलच्या एका क्लिकवर सर्व माहीती मिळायला लागली विज्ञानाचा गैरवापर करुन संहारक हत्यारे वापरतात माणूसच उठला माणसाच्या जीवावर स्वार्थाने सर्वनाश करत सुटतात विज्ञानाचा केला चांगला वापर तर विज्ञान आहे वरदा...