Skip to main content

प्रेम

प्रेम हे प्रेम असते

प्रेम ही घेण्याची गोष्ट नाही
तर ती आहे देण्याची
प्रेम हे जबरदस्तीने नसते
तर त्याची व्याख्या आहे त्यागाची

आईवडिल रात्रंदिवस कामं करतात
करायचे म्हणून नाही करत
आपल्या बाळांच्या प्रेमापोटी
ते मात्र राबत असताततरच त्याला अर्थ आहे

डोळे पुसणारे असतील कुणी
तर रडायला अर्थ आहे
खांदा असेल डोकं टेकायला
तर मनावरच्या दडपणाला अर्थ आहे

असतील  कुणी वाट बघणारे
तर घरी जायला अर्थ आहे
असलीत आपली माणसे
तर खर्च करायला अर्थ आहे

सेवा करायला कुणी असेल
तर आजारी पडायला अर्थ आहे
आपली समजूत काढणारे असलील
तर रुसायला फुगायला अर्थ आहे

प्रेमाची कदर करणारे असतील
तर  प्रेमाला अर्थ आहे
कुणी मनापासून ऐकत असेल
तर आपल्या शब्दांना अर्थ आहे

आईवडिलांचा सन्मान असेल
तर मुलांना अर्थ आहे
मुले संस्कारी असतील
तर आईवडिलांना अर्थ आहे

असेल मनात भाव
तर देवळात जायला अर्थ आहे
असेल समर्पणाची भावना
तर हात जोडायला अर्थ आहे

लोकांची मदत करायची असेल
तर ताकदीला अर्थ आहे
लोकांना दिशा दाखवायची असेल
तर त्या ज्ञानाला अर्थ आहे

नात्यात प्रेमाचा ओलावा असेल
तर त्या नात्याला अर्थ आहे
एकमेकांत विश्वास असेल
तर कोणत्याही व्यवहाराला अर्थ आहे

प्रामाणिकपणे काम करायचे असेल
तर नोकरीला अर्थ आहे
वाईट व्यसनांचा त्याग असेल 
तर त्यागाला अर्थ आहे

कष्टांने पैसे मिळवले असतील
तर त्या पैशांना अर्थ आहे
अपेक्षा न ठेवता मदत केली
तर निस्वार्थ कर्माला अर्थ आहे

निसर्गाबद्दल प्रेम असेल
तर भटकंतीला अर्थ आहे
पाऊसाबद्दल प्रेम असेल
तर त्याच्यात भिजायला अर्थ आहे

अध्यात्मतेचे ज्ञान असेल
तर जीवनाला अर्थ आहे
देवाच्या नामात आस्था असेल
तर भजनाला अर्थ आहे

किर्ती मागे उरली
तर मरणाला अर्थ आहे
जीवंतपणी मिळाला मोक्ष
तर जगण्याला अर्थ आहे

प्रा. दगा देवरे

आपली मुले नाही आलीत वेळेवर
आईबाबांचा जीव लागतो टांगणीला
प्रेमाची व्याख्या आहे काळजी घेणे
म्हणून घोर लागतो त्यांच्या जीवाला

ठेच लागते आपल्या बाळांना
डोळ्यात पाणी येते आईबाबांच्या
प्रेम व्यक्त होते डोळ्यातून
म्हणून कडा पाणवतात डोळ्यांच्या

प्रेम हे नसावे आंधळे
करुणा दया क्षमा शांती असावी
डोळसपणे केलेल्या प्रेमाची
अपेक्षा नेहमी धरावी

प्रेम बघायचे असेल तर
गाय वासरात बघावे
सुगरणीही घरटे बांधते
तिच्या प्रेमाचे निरीक्षण करावे

उन्हामुळे तापते धरणीमाता
पावसाला जाणवते आपली उणीव
गडगडाट करत आतूर होऊन
करतो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव

प्रेमामुळे जेव्हा हिंसा होते
ते असते  स्वार्थी प्रेम
आपला फायदा करण्यासाठी
म्हणतात माझे आहे खरे प्रेम

पशुपक्षीही करतात प्रेम
भरवतात एक एक दाणा पिलांना
आपल्या पंखाखाली उब देऊन
दु:खी होत नाहीत त्रास सोसतांना

मातृभूमीच्या प्रेमापोटी दिले
अनेकांनी  आपल्या जीवांचे बलिदान
गोळ्या झेलल्या छातीवर
शत्रूंना यमसदनी पाठवून

भक्तांच्या प्रेमाखातर घेतो
जन्म धरतीवर देव वैकुंठाचा
भक्तांचे रक्षण करुन
देतो आनंद त्यांना जीवनाचा

देवावरच्या प्रेमापोटी
काहींनी केला संसाराचा त्याग
त्याचे जप ध्यान भजन करुन
शोधून काढला त्याचा माग

अनेक राजकारणी लोकांनी देशासाठी
स्वत:च्या संसाराची केली होळी
संपूर्ण आयुष्य देशासाठी देऊन
रिकामी केली आपल्या प्रेमाची झोळी

प्रेम देतांना परतीची
कोणतीही अपेक्षा ही नसावी
त्यामुळे होत नाही प्रेमभंग
ही गोष्ट लक्षात ठेवावी

चंद्राच्या निस्वार्थी प्रेमाने
भरती येते समुद्राला
ती आहे प्रेमाची पावती
हे समजायला हवे माणसाला

नदी धावत सुटते
प्रेमापोटी समुद्राला भेटण्यासाठी
समुद्रही वाट बघतो तिची
तिला मोठे करण्यासाठी

माणूस म्हणून जन्म मिळाला
म्हणून जगण्यावर प्रेम करावे
निसर्गाच्या प्रेमात हरखून
स्वत:वरही प्रेम करुन बघावे

प्रा.दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...