Skip to main content

शरीर व गाडी

गाडी व आपले शरीर
गाडी व आपल्या शरीराची तुलना केली तर बरेच साम्य दिसेल . गाड्यांचा जसा आकार असतो जसे काही बुटक्या, काही उंच ,काही दिसायला आकर्षक तर काहींचा मागचा भाग सपाट तर काहीचा वाढलेला काहीचा पुढचा भाग आकर्षक तर काहीचा नसलेला तसेच माणसांचेही आकार गाडीसारखे असतात .गाडींचा रंग पांढरा काळा पिवळा लाल तसेच माणसांचेही रंग असतात . गाडीत इंधन व पाणी टाकल्याशिवाय गाडी चालत नाही तसे शरीरात अन्नपाणी दिल्याशिवाय शरीरही चालत नाही .गाडीत भेसळ इंधन जेव्हा टाकतो किंवा पेट्रोलची गाडी आहे व डिझेल टाकले तर गाडी बिघडते तसेच आपल्या शरीरात नेहमीचे अन्न सोडून भेसळ घेतल्यास शरीर बिघडते .गाडीत जसे ब्रेक,एक्सलेटर ,क्लच असतात तसेच माणसाच्या मनाला हे वरील असतात .मनाचा ब्रेक चांगला असेल तर माणूस चांगले जीवन जगतो .काय बोलायचे कुठे बोलायचे कुणाला बोलायचे तसेच भावना याच्यावर ब्रेक असेल तर ठीक नाहीतर गाडी ब्रेक डाऊन झाल्यावर जशी आदळते तसेच माणसाने मनावरचा ब्रेक गमावला तर समजा तो आदळणार व स्वत:चे प्रचंड नुकसान करुन घेणार.मनातील विचारांचा वेग किती ठेवायचा हे माणसाला ठरवता आले पाहिजे जसे गाडीमध्ये एक्सलेटरमुळे  वेग किती यावर ठरते तसेच क्लचमुळे गाडीचा गियर बदलता येतो तसेच माणसाचा मुड, त्याचा दृष्टिकोण हा सतत बदलत असतो त्याशिवाय जीवन पुढे जात नाही.गाडीची सर्विसिंग वेळोवेळी केली तर ती चांगली चालते त्याचप्रमाणे शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी वेळोवेळी औषधपाणी घेतले पाहिजे .मानसिक आरोग्यासाठी चांगले विचार ,चांगली संगत, सकारात्मक दृष्टिकोण यामुळे माणसाची सर्विसिंग होत असते .
                 गाडीला काही वर्ष झाले की तिच्या कुरबुरी चालू होतात तसेच माणसाचे वय झाले की शरीराच्या तक्रारी चालू होतात.गाडीतील अनेक पार्टस बदलता येतात तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाच्या शरीरातील पार्टस बदलता येतात.गाडीचे temp. पाणी नसल्याने जसे काही वेळा वाढते त्याचप्रमाणे माणसाला पण temp.येत असते .गाडीवर जसे आपण स्वार होतो तसेच आपल्या शरीरावर आत्मा हा स्वार असतो. गाडीचे डोळे जेवढे तिरपे असतील तेवढी गाडी छान दिसते पण माणसाचे डोळे सरळ असतील तरच तो छान दिसतो .माणसाचे ह्रदय बंद पडले की त्याचे अस्तित्व संपते पण गाडीचे इंजिन बंद पडले तर दूरुस्त करुन किंवा दुसरे इंजिन टाकुन गाडी पूर्ववत होते  म्हणजे याबाबतीत माणसापेक्षा गाडी श्रेष्ठ ठरते .गाडीचे आयुष्य जेव्हा संपते तेव्हा तिचे अनेक पार्टस उपयोगाला येतात तसेच माणसाचे अनेक अवयव इतरांना उपयोगी पडू शकतात पण माणसाचे आयुष्य संपले की काही तास गेल्यानंतर  शरीर व माती यात काहीही फरक नसतो म्हणून गाडीकडून आपल्याला बरेच शिकता येते व ती आपली गुरू होऊ शकते .बघा पटतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...