विचारांचा जुलाब
जेव्हा आपणनको ते खातो ते शरीरात पचन झाले नाही म्हणजेच शरीराला मानवले नाही तर शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपले पोट बिघडते त्याला आपण जुलाब म्हणतो तसेच नको ते विचार मनात आलेत व त्यांची गर्दी जेव्हा मनात होते आणि ते विचार मनाच्या विरोधी असतात अशावेळी त्या विचारांना विचारांचा जुलाब झाला असे म्हणू शकतो व हा जुलाब जेव्हा होतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो .मन सैरभैर होते .कशात लक्ष लागत नाही .कोणतेही काम सहज रितीने होत नाही.माणसाच्या हातून चुका व्हायला सुरवात होते.मन थार्यावर नसते .ह्या जुलाबामूळे मानसिक टेंशन होते तसेच रक्तदाबाचा त्रास सुरु होतो व अनेक रोग बाहेर डोकं काढतात असा विचारांचा जुलाब होऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोण खूप महत्वाचा असतो .भविष्यांची चिंता व भूतकाळातील घटना यांचे चिंतन न करता वर्तमानात जगावे व आलेल्या समस्येतुन कसा मार्ग काढता येईल याचा विचार करावा तसेच आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .बोलण्यावर नियंत्रण असावे मी आहे म्हणून सर्व चालू आहे हा भ्रम काढून टाकावा व मलाच सर्व ज्ञान आहे हा गैरसमज काढून टाकावा दुसर्याच्या दृष्टिकोनाचाही विचार करावा त्यामुळे विचारांचा जुलाब आपल्याला थांबवता येईल. जसे शरीराचा जुलाब थांबल्यावर पोटाला कशी छान विश्रांती मिळते तसेच विचारांचा जुलाब थांबल्यावर मनाला शांती मिळते .मनाला शांती मिळाली की शरीर निरोगी बनते .बघा पटतं का?
दगा देवरे सर
रुपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment