हसरा चेहरा
काही जण असतात गंभीर
जसे जगाचे संकट त्यांच्यावरी
हसणे त्यांना नसते माहीत
सतत दिसते चिंता चेहर्यावरी
आपला चेहरा हसरा ठेवणे
त्यांना वाटते आपला वचक जाणे
आपल्याला बघितल्यावर सतत
दुसर्याला आपली भीती वाटणे
हसरा चेहरा असतो
चांगल्या आरोग्याची पावती
आपला हसरा बघून
जुळतात दुसर्याशी चांगली नाती
माणूस आतून असेल आनंदी
त्याची झलक दिसते चेहर्यावर
उगीचच कोणते टेंशन न घेता
विरझन घालू नये आपल्या आनंदावर
बरेच बाॅस लोक विसरतात
खूर्ची मिळाल्यावर हसणे
सतत कामाचे ओझे घेऊन
विसरतात खरे जीवन जगणे
हसरा माणूस प्रत्येकाला
हवा हवासा नेहमी वाटतो
गंभीर माणसापासून प्रत्येकजण
दोन हात लांबच राहतो
माणसा जवळ असावी कला
सर्व परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी
देव काढत असतो सतत फोटो
छान अल्बम तयार करण्यासाठी
लहान मुल प्रत्येकाला आवडते
कारण ते असते सतत हसत
निरागस त्याचे हसणे बघून
आपल्याला भान विसरायला होतं
काही माणसाचे हसणे असते कृत्रिम
दुसर्याला फक्त दाखविण्यासाठी
दुसर्याला नेहमी कमी दाखवून
हसतात फक्त खिजविण्यासाठी
हसण्याला असावी मर्यादा
लोक काढतात वेड्यात
हसण्याने होऊ नये दुसर्याला त्रास
याचे भान ठेवावे मनात
काही माणसे हसतात
दुसर्याचे वैगुण्य बघून
अशा विद्रुप हसण्याने
आपलेच होते कलूषित मन
हसणे आहे देवाने दिलेली देणगी
त्याचा माणसाने करावा वापर
त्याने आरोग्य राहते चांगले
रोग पळतात आपल्यापासून दूर
दगा देवरे सर
रुपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment