connection
परमेश्वर नेहमी आनंदी समाधानी असतो .आपण त्याचाच एक अंश आहे .ज्यावेळी आपण आनंदी समाधानी असतो तेव्हा समजावे की त्याच्याशी आपले connection जुळलेले आहे .तो म्हणजे input व आपण असतो output .input व output मध्ये connection असेल तर जे input मध्ये आहे ते output मध्ये नक्की येणार पण जेव्हा त्या connection मध्ये कचरा साठला असेल तर त्याने कितीही input पाठवले ते output पर्यंत येऊच शकणार नाही .आपण संसारातील राग द्वेष मत्सर चिंता हेवेदावे लालसा बदला याने एवढे भरुन गेलेलो आहोत की त्याच्याकडून येणारा आनंद समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे आपण नेहमी छोट्या मोठ्या गोष्टींनी दु:खी होतो व सर्व असूनही समाधान आपल्याला मिळत नाही कारण input व output मध्ये जी cod असते ती संसारातील अवगुणांनी खराब झाली आहे किंवा तुटली आहे म्हणून परमेश्वराकडून आनंद व समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे ज्याचे connection त्याच्याशी जुळलेलेले असते तो माणूस जीवनात नेहमी प्रसन्न आनंदी समाधानी दिसतो.कोणत्याही गोष्टीनी तो विचलीत होत नाही कारण connection असल्यामुळे त्याला एक भक्कम आधार वाटतो .संसारातील कोणत्याही गोष्टींनी क्षणिक आनंद व क्षणिक दु:ख त्याला नसते तर नेहमी आनंद व समाधान त्याला वाटत असते म्हणून परमेश्वराशी असलेली cod मजबूत करायला हवी .संतानी सांगितलेली नवविधा भक्तीने ती cod connect होईल व भक्कम.
दगा देवरे सर
Comments
Post a Comment