Skip to main content

झोपलेला राक्षस

झोपलेला राक्षस
प्रत्येक माणसामध्ये चांगला व वाईट विचार करण्याची क्षमता असते .जसे आपण विचार करणार तसे आपले इंद्रिये प्रभावित होतात व कार्य करायला लागतात .जसे की एखादे भजन आपण ऐकले की आपले मन एकाग्र होऊ लागते .भक्तीभावाने संपूर्ण अंग रोमांचित होते व मन उत्साहाने भरुन जाते पण जर आपल्या मनात एखाद्याबद्दल राग असेल व तो विचार केला तर आतून सुडाची भावना निर्माण होते व तो आत झोपलेला राक्षस त्या आपण केलेल्या विचारांनी जागा होतो व कोणत्या प्रकारे सूड घ्यायचा अशा विचाराने आपण बेचैन होतो तसेच एखाद्याच्या मनात वासना निर्माण झाली तर त्या विचारांनी मन सैरभैर होते मग अत्याचार बलात्कार यासारख्या घटना घडतात .आपण नको ते विचार करुन आत झोपलेल्या राक्षसाला उठवतो व तो जागा झाल्यावर अनेक वाईट कृत्ये घडवून आणतो  व सर्व शांत झाल्यावर तो झोपतो व तोपर्यंत त्याने आपल्याला व  समोरच्याला बरबाद करुन टाकलेले असते त्यामुळे रावण बाहेर नाही आपल्यातच आहे .काहींचा तो कायम जागा असतो तर काहींचा झोपलेला असतो .त्याला जागे होण्यासाठी विचाररुपी खतपाणी आपणच घालत असतो म्हणून मनात वाईट विचार येत असतील तर ते लगेच काढणे सोपे नसते तर जशी एखादी बस भरघाव वेगाने धावत असते पण मध्येच जर टर्न घेतला तर तिचा वेग आपण कमी करतो व वेगळ्या रस्त्याने ती सावध चालायला लागते तसेच एखाद्या वासनेपोटी मन भरकटत चालले असेल तर आपण एखादा चांगला विचार ,आईवडिलांचे स्मरण करुन टर्न घ्यावा व असे केल्याने जागा होत असलेला राक्षस पुन्हा झोपतो  अशामुळे अनेक अनर्थ टाळता येतात व सुखाने जीवन जगता येते .आत झोपलेला राक्षस मग रागाचा असेल ,द्वेषाचा असेल ,मत्सराचा असेल,लोभाचा असेल,स्वार्थाचा असेल असे अनेक प्रकारचे राक्षस आत झोपलेले आहेत म्हणून त्यांना कायमचे झोपू द्यावे .जर आपल्यावर किंवा दुर्बलांवर अन्याय होत असेल तर मग त्या राक्षसाला उठवलेच पाहिजे पण साध्या गोष्टींनी त्यांना उठवून आपले जीवन अशांत करु नये .उदाहरणे सांगतो ,सुट्ट्या पैशांवरुन रिक्षावाल्यांची वाद,बस किंवा ट्रेनमध्ये धक्काबुक्की, बायकोने केलेले न आवडलेले जेवण,क्षुल्लक गोष्टीवरुन एकमेकांवर येणे,उसने पैसे कुणी परत करत नसेल ,उसने पैसे देत नसेल,संपत्तीवरुन भांडणे,माझेच सर्वांनी ऐकायचे हा हेका,कर्जाचे हप्ते , घर घेणे, गाडी घेणे,मुले ऐकत नाहीत , शारिरीक आजार ,मुलांचे शिक्षण, घरातील वयस्कर व्यक्तीचे वागणे, मुलामुलींची लग्न, मुलामुलींची लग्न झाल्यावर सासरकडील लोकांचे वागणे असे अनेक प्रकारचे प्रसंग येतात व आपल्यातले राक्षस जागे होतात .राक्षस जागा झाला तरी आपले व समोरच्याचे नुकसान होणार नाही याचा त्यावर अंकुश असला पाहिजे .छोट्याशा जीवनात कशाला हवे पोलीस स्टेशनाच्या फेर्‍या , कोर्टाच्या फेर्‍या .जीवनातले महत्वाचे देवाने दिलेले दिवस टेंशनपायी का वाया घालवायचे .घरात बायको पोरं सर्व चांगले असतांना काहींना बाहेरची चटक लागलेली असते व अंगाशी आले की आत्महत्या करतात किंवा कुटुंब संपवतात .छोट्याशा जीवनात कष्टाची चटणी भाकरी महत्वाची व कोणतेही झंझट आपल्या मागे लागता कामा नये याचा विचार करावा त्या झंझटमुळे आपले मोलाचे दिवस वाया जातात.जे कमवू ते येथेच टाकुन जायचे आहे एक दिवस याचा विचार करावा व शांततेने आयुष्य कसे जगता येईल ते बघावे .इतरांना आपला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल याचा विचार करावा .समाजामध्ये ज्यांच्या विचारांनी आपले मन भरकटते त्या माणसांपासून दोन हात लांब राहावे  व adjustment करायला शिकावे .माझेच विचार बरोबर आहेत हा हेका सोडावा .समोरच्याचे पण विचार चांगले असू शकतात याचा विचार करावा .सर्व प्रथम समोरच्याचे ऐकुन घ्यावे व सारासार विचार करुन निर्णय घ्यावा अशा अनेक गोष्टींनी आत असलेला राक्षस कायमस्वरुपी आपल्याला झोपविता येईल .बघा पटतं का
देवरे सर 
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...