Skip to main content

समाजातील भयानक चित्र

समाजातील भयानक चित्र
आजषौ" तरुण मुलामुलींचे भयानक चित्र समाजात दिसते आहे .तरुण व तरुणींचे शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी नाही त्यामुळे लग्न नाही .लग्नाचे 25 वय कधीच उलटून गेले .काहींचे तीस पस्तीस ही उलटून गेले पण मुलगी मिळत नाही .जे तरुण नोकरीला आहेत त्यांना स्वत:चे घर आहे का गाडी आहे का जमीन आहे का व पॅकेज भक्कम आहे का असे प्रश्न विचारले जातात .एखादा मुलगा इंजीनिअर असेल किंवा शिक्षक असेल किंवा आणखी कोणत्या खात्यात असेल तर त्याला त्याच्या education सारखी मुलगी पाहिजे असेल तर ती जमीन ,घर ,पॅकेज  चांगले असेल तरच होकार देते म्हणून मुलगा जरी नोकरीला असेल तरी त्याला हवी असलेली त्याच्या खात्यातली मुलगी मिळणे अवघड झाले आहे मग ज्यांना नोकरी नाही त्यांचे तर विचारुच   नका व त्यातून शेतकरी मुलांचा प्रश्न बिकट झाला आहे .पालकांची झोप उडाली आहे 30-35 वर्ष झालीत पण मुलगा व मुलगी बिन लग्नाचे व काही बिन नोकरीचे घरात आहेत .काय करावे काही सुचत नाही 30-35 वर्षात पालकांचा अर्धा संसार झालेला होता पण मुलांची सुरवातच झाली नाही जीवनाला या चिंतेने त्यांना ग्रासलेले आहे यातून मार्ग निघण्याचे मार्ग बंद झालेत .अशी भयानक परिस्थिती प्रत्येक खेड्यात प्रत्येक शहरात प्रत्येक समाजात बघायला मिळते आहे .काही ठिकाणी मुली आहेत पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वर नाही व काही ठिकाणी मुले आहेत पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुली नाहीत त्यामुळे तडजोड करुनही काही जमत नाही मग थोड्यासाठी कशाला आता लग्न करतो असे टोमणे त्यांना ऐकायला मिळतात. बर्‍याच ठिकाणी पालक 70-80 वयाचे आहेत व आपल्या मुलांचे लग्न अजून झालेली नाहीत या विचाराने  त्यांना मानसिक व शारिरीक आजार जडले आहेत त्यामुळे त्यांना कोणते सण वगैरे गोड लागत नाहीत. असे चित्र बदलण्यासाठी एक तर नोकरीच्या संधी ,रोजगाराच्या संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध करुन द्यायला हव्यात तसेच शेतीमालाला हमी भाव नक्की मिळाला पाहिजे जेणेकरुन शेतकरी लखोपती व करोडपती होतील व मुली म्हणू लागतील शेतकरी नवरा असेल तर चांगला तेव्हा ही परिस्थिती नक्की सावरेल.बघा पटतं का
देवरे सर

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...