Skip to main content

खरा धोका

खरा धोका
आपण जीवनात अनेक धोके खातो कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शत्रूंकडून त्रास पण ही आपत्ती व शत्रूंकडून त्रास हा आपण गृहीत धरलेला असतो व त्याविरुद्ध लढण्याचे बळ आपल्याला मिळत असते व आपण लढतो पण खरा धोका जर कोणता असेल तर आपल्या लोकांकडून ज्यांना आपण आपले मानले मग ते नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील .आपण आपल्या त्रूटी सर्व सांगून मोकळे होतो .आपण केलेल्या चुका आपण सांगून मोकळे होतो म्हणजे आपण आतबाहेर जे असतो ते सर्व आपण ज्यांना आपले मानले त्यांना माहीत असते .आपल्यातील गुप्त गोष्टी आपण सांगून मोकळे होतो व तेव्हा आपल्याला छान हलके वाटते पण काही दिवसांनी आपण ज्यांना आपले मानले त्यांच्यात व आपल्यात काही गोष्टींनी बिनसले म्हणजे मी मी तू तू झाले तर ज्यांना आपले मानले ते शत्रू होतात व मग आपल्याबद्दल ज्या गुप्त गोष्टी आपण त्यांना सांगितलेल्या असतात त्याचे ते आपली बदनामी करण्यासाठी भांडवल तयार करतात व वेळ आली तर आपल्याला उघडे पाडतात तेव्हा आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही .ते कोणताही विचार करत नाही की कुणीतरी आपल्यावर विश्वास असल्यामुळे सांगितले आहे पण त्या विश्वासाचा चक्काचूर होतो .आपण कसे आहोत हे त्यांना पूर्णपणे माहीत असते व त्याचाच उपयोग करुन ते आपल्याविरुद्ध  कटकारस्थान करण्यासाठी बेत आखत असतात .ज्यांना आपण आपल्या घासातला घास दिला असेल ते विसरुन आपल्याला बदनाम करण्याचे काम करत असतात म्हणून खरा धोका हा ज्याला ओळखण्यात आपण कमी पडलो त्याच्याकडून असतो .आपल्या घरी  खाऊन पिऊन जाणार पण बाहेर आपल्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी सांगत जाणार असेही लोक असतात .आपला खरा माणूस एकतर दूर जात नाही व जर दूर गेला तर गैरसमज दूर करण्याचे काम करतो .दूर गेला तरी ज्या विश्वासाने आपण त्याला काही सांगितले आहे त्याचे भांडवल करत नाही म्हणून खरा धोका कुणाकडून आहे हे आपल्याला अनुभव आल्याशिवाय कळत नाही म्हणून सावध रहा व आपले पत्ते सहसासहजी उघड करु नका.आपल्यातील सकारात्मक गोष्टी कळल्या तर काही बिघडत नाही पण आपल्यातील नकारात्मकता, आपल्याकडून अनावधानाने झालेल्या चुका, आपली गरीबी हे चुकुनही सांगत बसू नका. आपल्या कुटुंबातील लोकांमधील आपले संबंध चांगलेच आहे हे सांगा कारण आपल्या कुटुंबात तालमेल नाही असे जर त्यांना कळले तर बाहेर जाऊन कुणाजवळ तरी ते सांगणार व मग आपल्याच लोकांमध्ये फूट पाडायला कारण आपणच तयार करत असतो . आपणच भविष्यात आपली बदनामी करण्याचे भांडवल पुरवत असतो .जरा विचार करा की तुम्ही एखाद्यावर खूप उपकार केलेत ,त्याला आपले मानले ,त्याच्यासाठी जीवन पणाला लावले व तीच व्यक्ती मोठी झाल्यावर आपण केलेले सर्व विसरली व आपलीच बदनामी करु लागली त्यावेळी तुम्हांला वाटत असेल की उगीचच मी त्या व्यक्तीसाठी केले .नसते केले तर आज मला हे दु:ख भोगावे लागले नसते म्हणून शत्रूंकडून असलेला धोका आपण पचवू शकतो पण आपल्या माणसांकडून, आपल्या मित्रांकडून असलेला धोका पचवणे कठीण असते त्यासाठी सावध राहणे फार महत्वाचे असते .बोलण्यामध्ये वाहत न जाता होशमध्ये राहणे नेहमी चांगले,बघा पटतं का?
दगा देवरे सर

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...