काळ
काळ बसला आहे टपून
संधीची बघतो आहे वाट
संधी येताच मारतो झडप
नाही बघत रात्रं आणि पहाट
नाही बघत बालक आहे की बालिका
बघत नाही तो म्हातारा आहे की तरुण
बघत नाही स्री आहे की पुरूष
असते काळाचे कठोर मात्र मन
सामान्य आहे की असामान्य
याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नाही
वेळ संपताच एखाद्याची
उचलून नेतो सारे काही
दया याचना चालत नाही काही
ज्याला नेले तो परत येत नाही कधी
थोड्या काळासाठी असते अस्तित्व
माणसाने विचार करावा आधीमधी
सौदर्य कुरुप उंच बुटका
बारीक जाड त्याच्यापुढे असते समान
जैसे कर्म केले तेचि भोगा आले
हा कर्माचा सिद्धांत घ्यावा समजून
मी मी आणि तू तू करण्यात
येते जन्माला आपत्ती
मान सन्मान पैसा संपत्ती पद
क्षणाचै असतात सोबती
लोभामुळे माणूस जातो
काळाच्या जबड्यात लवकर
स्वार्थी मन माणसाला
सुखापासून ठेवते मात्र दूर
कोणतेही कर्म करतांना
काळाचे नेहमी स्मरण करावे
सतत जागृत राहून माणसाने
सत्याला कधीच न विसरावे
येतो माणूस एकटा जातोही एकटाच
शेवटी असते जीवनाची शून्य बाकी
काहीही घेऊन आलेला नसतो
जातांनाही नसतो नेत काही
दगा देवरे सर
Comments
Post a Comment