फोटो
वाॅटसअपमध्ये फोटो बघतास
उडते मनाची धांदळ
काय असेल मेसेज खाली
यासाठी मनाची होते तळमळ
फोटोखाली शुभेच्छा दिसल्यावर
मन होतेआनंदी
मग बराचवेळा वाॅटसअप बघण्यात
मनावर घालता येत नाही बंदी
फोटोखाली श्रद्धांजली बघितल्यावर
मनाची होते घालमेळ
काय झाले असेल असा विचार करत
मन विसरते काळवेळ
जवळची व्यक्ती गेली कळल्यावर
मन होते बैचैन
दिवसभर त्याच्याच विचाराने
मन होते उदासिन
वाॅटसअपवर कुणाचे कौतूक वाचून
शुभेच्छा अभिनंदन सहजच करतो
त्याच्या परिश्रमाला आपण
सलाम करुन जातो
काहींचे जाणे वाचल्यावर
अश्रूंचे पाट वाहतात
त्यांचा चेहरा नेहमी डोळ्यांसमोर येऊन
मनात आठवणी दाटतात
वाॅटसअप उघडल्यावर काय असेल बातमी
हे कुणाला नाही येणार सांगता
ती बातमी बघूनच
मनाची कळणार अवस्था
दगा देवरे सर
Comments
Post a Comment