जीवन एक कथा
खरे पाहिले तर जीवन असते एक कथा.कितीही माणूस मोठा झाला तरी एक दिवस त्याची कथा बनते व ती कथा ऐकायला मिळते .काहींची कथा पराक्रमाची त्यागाची शौर्याची असते तर काहींची कथा दुष्टचक्रांची असते त्याच्या कुकर्माची असते .माणूस एवढा गुंतून जातो की त्याला विसर पडतो की आपली एक दिवशी कथा हो,
ळीनननलतशॅङङ आहे.काहीजण दुसर्याशी एवढे वाईट वागतात की सांगायला नको त्याचे कारण म्हणजे ते विसरतात की आपली कथा होणार आहे .त्याला वाटते की आपण कायमस्वरुपी असणार आहोत त्यामुळे त्याला लोभ होतो व त्या लोभामुळे जास्तीत जास्त संपत्ती कोणत्याही मार्गाने कशी वाढेल याचा विचार करतो व त्यावेळी आपल्या अवतीभवती असलेल्यांना तो तुच्छ मानतो.काहीजण व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:चा नायनाट करुन घेतात व कथा लवकर बनून जातात .काहीजण संपत्तीवरुन स्वत:च्याच लोकांशी अबोला धरतात व एक दिवशी अबोला धरणारे व त्यांना अबोला धरायला लावणारे कथा बनून जातात व संपत्ती जागेच्या जागी राहते .ज्यावेळी माणसाला कळेल की आपण जे ही करतो आहोत ती एक दिवशी कथा होणार आहे त्यावेळी माणूस सतत जागृत राहील व आपल्याकडून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घेईल कारण ते कृत्यही एक दिवशी कथेत येईल.कथेचा विसर न पडणे हे चांगले कर्म करण्याकडे आरुढ करते .जीवन हे जन्म व मृत्यू यातील कथा असते .कितीही जगातला श्रीमंत असू द्या ,जगातला सर्वात ज्ञानी असू द्या , त्या देशाचे रत्न असू द्या,विश्वसुंदरी असू द्या सर्वांची एक दिवशी कथा होणारच असते म्हणून लोकांना आपली कथा चांगली वाटावी असे वाटत असेल तर तो जीवन जगत असतांना सतत जागृत राहील व जसा अभिनेता सिनेमामध्ये काम करत असतांना स्वत:ला विसरतो पण त्याला माहीत असते की ही कथा आहे त्यामुळे सिनेमातील पात्रातून बाहेर आल्याने तो पात्रासारखा वागत नाही त्याचप्रमाणे जीवन हा सिनेमा असतो जणू तो चालू असतांना आपणकथेचा नायक आहोत याची जाणीव ठेवावी ज्यादिवशी जाणीव होईल तो माणसाचा पुर्नजन्मच म्हणावा लागेल. माणसाला मान सन्मान अपमान बदला साॅरी न बोलणे अशा गोष्टींना एवढे महत्व देतो की कथेचा त्याला विसर पडतो .कथेचा विसर पडण्यासाठी खूप गोष्टी आपल्या अवतीभवती असतात .जागृत नसेल माणूस तर तो वाहवत जातो त्या गोष्टीकडे व मग कथेचा विसर पडतो .सर्वांची कथा होईल पण माझी होणार नाही असा भ्रम घेऊनच प्रत्येकजण वावरत असतो .आपल्या समोर आपल्या प्रियजणांची कथा झालेली असते तरी पण डोळ्यावर पट्टी बांधून माणूस वागत असतो .आपण फिरत असतांना जरा विचार करा की आजपासून 100 वर्षानंतर जे लोक आज आहेत त्या सर्वांची कथा होणार आहे म्हणजे एकही जीवंत नसणार व त्या जागी तेवढे किंवा त्यांच्यापैकी जास्त लोक नवीन असणार. एकदा माणसाची कथा झाली की मग ज्याच्यामुळै तो सैरावैरा वागत होता त्यातील काहीही त्याच्याबरोबर जात नाही .एकटाच जातो व एका कथेला जन्म देतो .बघा पटतं का?
दगा देवरे सर
Comments
Post a Comment