लगाम
माणसाला हवा लगाम
कोणतेही काम करतांना
सुरक्षित होते त्याचे काम
कोणतीही अडचण येत नसतांना
बोलतांना हवा लगाम
दिसतो अनर्थ टळतांना
लगामाने येते वागतांना तारतम्य
सामर्थ्य येते अडचणींचा सामना करतांना
संस्काराने येतो लगाम
कोणाचेही दडपण नसतांना
लगाम ठरवतो माणसाला
कुठे व कधी थांबतांना
साम दंडाने घालता येतो लगाम
माणसाला अनर्थ टाळण्यासाठी
त्यावेळी येतो त्याला राग
पण लगाम असतो त्याच्या भल्यासाठी
कोणतीही गोष्ट अती ही वाईटच
त्यासाठी हवा मात्र लगाम
माणसाचे जीवन होते सुखकर
मार्गी लागते त्याचे काम
लगाम नसलेला माणूस जातो आहारी
स्वत:चे नुकसान करण्यासाठी
जेलमध्ये आहेत गुन्हेगार
लगाम नसल्याने आहेत त्यासाठी
जबरदस्तीने लगाम नसतो उपयोगाचा
हवा स्वत:चा निश्चय
परिणामांचा विचार करुनच
पाऊले टाकावी जीवनात योग्य
अत्याचार बलात्कार खून होतात
माणसाला लगाम नसल्याने
माणूस तारतत्म हरवतो
लगाम योग्यवेळी न घालण्याने
माणसाचे जीवन आहे क्षणभंगूर
हा विचारच आहे त्याचा लगाम
क्षणिक सुखासाठी माणूस होतो सैरभैर
दु:ख पदरात पाडण्यासाठी
संत महापुरुषांचे विचारच घालतात
माणसाला जीवनात लगाम
त्यांच्या आचार विचारांचे अनुकरणाने
सहीसलामत होते त्याचे काम
लगाम नसलेल्या माणसाला वाटते
त्याच्या इच्छेनेच सर्वांनी वागावे
रागाने भरलेले असते त्याचे डोकं
लगाम नसल्याने वागतो त्याला जसे हवे
सत्ता पद पैसा यामुळे
माणसाचा सुटतो लगाम
गर्व अहंकार अभिमान द्वेषाने
माणसाच्या हातून होते गैरकाम
लगाम नसल्याने दिसतात
लोक व्यसनाधीन झालेले
स्वत:च आपले जीवन
दिसते बरबादीकडे नेलेले
स्वार्थी वृती असते
लगाम नसलेला मानव
निस्वार्थी वृती बनवते
लगाम असलेला महामानव
दगा देवरे
Comments
Post a Comment