Skip to main content

राग मारी वाघ मारी

राग मारी वाघ मारी

राग असतो गड्या
जीवनात फार घातक
मनाच्या कोपर्‍यात असतो दडून
बाहेर पडताच असतो मारक

रागाने लावली भल्याभल्यांची वाट
केली आयुष्यांची राखरांगोळी
स्वप्नांचा करतो क्षणार्धात चुराडा
वाट बघतो बाहेर येण्याची प्रत्येकवेळी

बदला घेण्याच्या मुळाशी असतो राग
माणूस विसरतो तेव्हा सारासार
त्या एकाच क्षणासाठी
मन बनते माणसाचै सैरभैर

तुरुंगात खितपत पडलेत गुन्हेगार
ऐन आयुष्यांच्या तरुणपणी
माणसाचा जन्म गेला त्यांचा वाया
ह्या सुंदर आयुष्यांच्या जीवनी

सारे जग आहे माणसाला
जीवनात आनंद घेण्यासाठी
रागाने कोंडले जेलच्या चार भिंतीत
केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी

राग दिसत नाही माणसाला
क्षुल्लक कारणांनी करतो माणसावर मात
प्रत्येकक्षणी माणसाने सावध राहून
त्याच्याशी करावी शांत मनाने बात

सुंदर चालले असते आयुष्य
रागाने होते क्षणार्धात उध्वस्त
कुणीतरी जवळचा असावा मित्र
ज्याच्याजवळ व्हावे माणसाने व्यक्त

राग जेव्हा येतो माणसाला
प्रिय व्यक्तीच्या जीवावर माणूस उठतो
ज्यांचे असतात अनंत उपकार
त्यांनाच माणूस संपवतो

रागाने जातो माणूस
आपल्याच माणसांपासून लांब
सर्व नाते तोडून
म्हणतो माझीच खरी बाब

अन्यायाबद्दल यायला हवा राग
पण योग्य मार्गाने व्यक्त करावा
माणसांमध्ये भेदाभेद न करता
प्रत्येकाचा सन्मान व्हावा

ज्याने मारला राग
वाघच मारला असे समजावे
मनातून मुळासकट उपटून काढून
त्याला दूर फेकावे

दगा देवरे सर

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...