घटकाभर विश्रांती
सकाळ पासून रात्रीपर्यंत
सारखा असतो तू धावत
का व कशासाठी करतो मी
असा प्रश्न शिरत नाही मनात
काही जण नाष्टापाणी न करता
निघतात आपल्या कामाला
एकच मनात असतो विचार
उशिर होऊ नये जायला
वेळेवर नसते खाणेपिणे
मन नसते जागेवर
सारखी चिंता असते सतावत
माणूस नसतो भानावर
पैसा पैसा करत करत
संपत्ती घ्यायचा असतो ध्यास
स्वत:च्या शरीराचा विचार न करता
मनात भरलेला असतो हव्यास
कुठे तरी आता थांबले पाहिजे
हा विचार करायला नाही वेळ
स्वत:कडे दुर्लक्ष करुन
नाही अंगात राहिले बळ
कुणाशी बोलायला नाही वेळ
नाही वेळ कुणाची मदत करायला
सततच्या कामाच्या धावपळीत
विश्रांती नाही जीवाला
दुसर्याची निंदा करण्यात
खर्ची करतो आपले जीवन
दुसर्याला धडा शिकविण्यात
गुंतले असते सतत मन
काळ जवळ येऊन ठेपला
तरी हव्यास नाही संपला
एका छातीतल्या कळने
त्याचा जीव मात्र घेतला
शरीर सर्व बाजूंनी सुटले
याचे नाही राहिले भान
संपतीच्या हव्यासापायी
धावत असते तनमन
पद व प्रतिष्ठा यासाठी
जातो तू कोणत्याही थराला
ते सारे असते क्षणिक
हे मात्र तू विसरला
आपण आहोत पाहूणे
पृथ्वीवर थोड्या दिवसांसाठी
काही वेळ माणसाने काढावा
दुसर्याला मदतीचा हात देण्यासाठी
माणसाने करावा विचार
का व कशासाठी जगतो आपण
हाव हाव व काव काव न करता
ठेवावे आपले शांत मन
दुसर्याला माफ करणे
ही आहे मनाची खरी स्वच्छता
दुसर्याबद्दल तिरस्काराची भावना
सोडण्याची वेळ आली आता
स्वत:साठी वेळ द्यावा
घ्यावी घटकाभर विश्रांती जीवनी
काही चुकीचे काम झाले का
याचा सतत विचार करावा मनी
जेव्हा येतो काळ जवळ
जावे लागते एकट्याला
कशासाठी पाठविले होते
याचे उत्तर द्यावे लागेल विधात्याला
दगा देवरे सर
Comments
Post a Comment