Skip to main content

धावपळ

धावपळ

करतात सर्वजण सकाळपासून
नुसतीच सारखी धावपळ
प्रत्येकाच्या मनात चालते
विचारांची सतत वळवळ

का धावतो हे कळत नसूनही
धावत  सुटतात रस्त्याने
मुक्काम मात्र सापडत नाही
मन भरते तेवढे टेंशनने

बस ट्रेन दिसली की
सुटतात तिच्यात चढायला
ट्रॅफिक जाम  असेल तर
संताप मात्र सुरवात करतो घुसायला

जन्मापासून मरेपर्यंत माणसाला
क्षणाचीही मिळत नाही फुरसद
अडकून घेतो  स्वत:च संसारात
शोधत असतो फक्त आनंद

धावपळ करता करता एकदिवस
येतो जीवनाचा शेवटचा
महत्वाचे काम राहते बाकी
मग पश्चाताप येतो धावपळीचा

कितीतरी वर्ष निघून जातात
नुसत्या सतत धावपळीने
निवृत होण्याची वेळ येऊन ठेपते
पण राहूनच जाते जीवन जगणे

प्रा. दगा देवरे

Comments