हवेचा फुगा व जीवन
हवा भरलेला फुगा जिकडे वारा वाहतो तिकडे जातो.अगदी उंचच उंच आकाशाकडे झेप घेतो आपण कुठुन आलोत याचे भान विसरतो व गर्वाने फुगून स्वत:वरचा दाबा हरवुन बसतो व कुणाकडे न बघता फक्त उंच जातो व सर्व दिशांना भरकटतो मग हवा गरम होते आतील व फुटतो मग जमीनवर आपटतो त्यावेळी त्याच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही लोक पायाने तुडवतात आणि त्याचे अस्तित्व संपते तसेच माणसाचे असते जरा काही यश पैसा मान मिळाला की गर्वाने असा काही फूगतो की आजुबाजूला लोक आहेत हे विसरतो आपल्याच धुंदीत जगत असतो ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले हे ही विसरून जातो अहंकार अभिमान गर्व कधी त्याच्या मनाची जागा घेतात हे ही त्याला कळत नाही मग एक दिवशी असं काही संकट येते की त्याचा पैसा मान सर्व काही निघुन जाते किंवा आलेल्या संकटापुढे पैशाला व पदाला काहीही किंमत उरत नाही किंवा आलेले संकट पैसा किंवा पद दुर करु शकत नाही त्यावेळी तो भानावर येतो पण वेळ निघुन गेलेली असते व पश्चातापाशिवाय हातात काही नसते म्हणून माणसाजवळ पद असो पैसा असो मान असो संपत्ती असो हे सर्व भासमान असते माणसाला भुलवणारे असते त्याचा उपभोग जरूर घ्यावा पण त्यापलीकडेही जीवन आहे अवतीभवती पण माणसे आहेत याची जाणीव ठेवावी व जे आपल्याजवळ आहे ते कायम टिकणारे असेलच असे नाही किंवा ते उपभोगायला आपण कायम राहाणारे असु याची शाश्वती नाही म्हणून जीवनाचा विचार केला की तेव्हा कळते दुसर्याबद्दल राग द्वेष हे फार किरकोळ आहेत व आपल्याजवळ असलेला अहंकार अभिमान गर्व हेच तर आपले खरे शत्रू आहेत.जेवढे नुकसान माणसारुपी शत्रू करत नाही त्यापेक्षा प्रत्येक मिनिटाला सेकंदाला अभिमान अहंकार गर्व रुपी शत्रू आपले करत असतात .ते आपला दृष्टिकोन बदलून टाकतात व म्हणून कितीही चांगले असले तरीही काहींना वाईटच दिसते.म्हणून आपले जीवन हवा भरलेल्या फुग्यासारखे आहे कधी फुटेल याची शाश्वती नाही त्याआधी प्रत्येक क्षण अहंकार रहित जगून घ्यावा तेव्हा जगण्याचा खरा आनंद मिळेल.
दगा देवरे
Comments
Post a Comment