Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

सीमारेषा

.सीमारेषा प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते मग धावण्याची शर्यंत असो कुस्तीची असो टेनिस असो फुटबाॅल असो की क्रिकेट  तसेच कोणत्याही कामाची एक सीमारेषा असते त्या सीमारेषेत झाले तर ठिक नाहीतर अनर्थ होतो .काही माणसांना भयंकर आजार असतो व डाॅक्टर सांगतात की याची आयुष्यरेषा काही महिण्यांची आहे व आपणही हळहळ व्यक्त करतो की अरेरे याचे आयुष्य आता संपणार पण निरोगी धडधाकट माणसालाही एक सीमारेषा असते की साधारणता 100 वर्षाचे जास्तीत जास्त आयुष्य नियतीने आपल्याला दिलेले असते मग आपले वय आजचे किती आहे ते बघायचे व उरले किती ते मोजायचे व आपली सीमारेषा किती दूर आहे की जवळ याचा अंदाज  येतो .ती सीमारेषा कोणत्या डाॅक्टरने सांगायची गरज नाही कारण त्या डाॅक्टरचीही सीमारेषा ठरलेली आहे . सीमारेषा कुणाची 100 वर्ष अंतरावर आहे तर कुणाची लवकर आहे . रोज आपण सीमारेषेच्या जवळ जात असतो पण माणूस तो विचार न करता दुसर्‍याला फसवण्यात व आपला स्वार्थ साध्य करण्यात गुंतलेला असतो  व त्यातच आनंद शोधतो आहे. काहीजण स्वत:च सीमारेषेला लवकर जवळ करतात व स्वत:ला संपवतात पण काही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात कोणतेही व्यसन न कर...

मन

मन प्रत्येकात मन असते पण दिसत नाही .ते मात्र आपले काम चोख बजावत असते ते स्वत:हून काहीच करत नसते .आपण त्याला जी सवय लावली ती घेतो व नियमीतपणे पार पाडतो म्हणजेच त्याला वाईट सवय लावली तर आपल्या नाशाला तो कारणीभूत होतो व चांगली लावली तर मात्र प्रगतीच्या शिखरावर बसवतो .एखाद्याला दारूची सवय लागली तर तो ज्या वेळेला दारू पितो त्या वेळेला ते मन त्याला आठवण करून देते व असे काय त्याच्या मागे लागते की दारू पिल्याशिवाय त्याला शांतच बसू देत नाही काहीं जण गुटखा तंबाखू बिडी सिगारेट ची सवय लावून घेतात मग तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामात असलात तरी मन त्याला सांगते उठ आणि ते तोंडात टाक .ते घेतल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही व मन ते घेतल्याशिवाय त्याला शांत बसू देत नाही              काहीजण सकाळी वाॅकिंग योगा प्राणायाम यांची सवय लावून घेतात मग सकाळ झाली की मन मागे लागते व ते करायला त्याला भाग पाडते काहीजण झोपतांना देवाचे भजन किंवा नामस्मरण करून झोपतात तसे नाही केले तर मन त्यांना स्वस्त बसू देत नाही काहींना वाचनाची सवय असते काहींना गाणे गायची काहींना चित्रकलेची  .जी जी...

तीन गोष्

तीन गोष्टी तीन गोष्टींना असते जीवनात फार महत्व आहेत तीनच गुण तामस रज अन् सत्व विश्वात महत्व आहे  फक्त तीनच देवांना ब्रह्मा विष्णू महेश असे म्हणतात त्यांना महत्वाच्या तीनच गोष्टी असाव्यात माणसाच्या मनी दया क्षमा शांती असावेत माणसाच्या सुंदर जीवनी अनेक झाडांना असतात विविध प्रकारचे पाने नाव मात्र घेतले जाते पळसाला तीनच पाने स्वर्ग मृत्यू पाताळ हे ही आहेत फक्त तीनच त्यांचा सांभाळ करणारे आहेत देव तीनच डोकं धड आणि पाय हे आहेत शरीराचे भाग तीन ते असावेत धडधाकट यासाठी प्रसन्न असावे मन दिवसाचे आहेत भाग तीन सकाळ दुपार संध्याकाळ माणूस अडकतो यात त्यासाठी नाही बघत वेळकाळ पावसाळा हिवाळा उन्हाळा ही आहेत तीन मौसम  देतात जगायला प्रेरणा  करतात ते आपआपले काम आई वडिल आणि गुरु हे तीन आहेत महत्वाचे त्यांच्या आशिर्वादाने जीवन होते प्रगतीपथाचे दत्त दत्त दिगंबरांना आहेत तीन मुख त्यांचे दर्शन घेताच वाटते मनाला खूप सुख बालपण तारूण्य म्हातारपण आहेत शरीराच्या तीन अवस्था प्रत्येकाला जावे लागते यातून जीवन जगण्याची सुटत नाही आस्था जीवनात तीन गोष्टीचीच आहे चर्चा सगळीकडे तीन तिघाडा काम बिघाडा असे म्हणतांना...