व्यसन व्यसन हे तीन प्रकारचे लोक करतात. पहिला प्रकार संसारातील अनेक संकटांनी त्याचे मन सैरभैर झाले असेल .बायको सोडून गेली असेल किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा व्यवहारात तोटा झाला असेल किंवा नोकरी गेली असेल किंवा हातून चुकीची गोष्ट झाली असेल .भाऊबंदानी छळले असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा गरीबी पिच्छा सोडत नसेल किंवा लग्न होत नाही किंवा अपमान सहन करण्याची ताकद नसेल असे नाना प्रकारचे कारणे असतात व ते विसरण्यासाठी लोक व्यसन करतात .दुसर्या प्रकारचे लोक म्हणजे अतिशय श्रीमंत ,कुठे पैसा ठेवावा हे त्यांना कळत नाही म्हणून त्या पैशाचा उपयोग इकडे पार्टी कर तिकडे पार्टी कर मग अशा पार्टींमध्ये व्यसन लागते त्यामुळे अनेक श्रीमंत घराण्यातील मुले हे पैसे भरपूर असल्यामुळे वाया जातात व त्यामुळे जगण्याचे तारतम्य विसरतात .पैशाला पायाखाली तुडवतात मग हाच पैसा एकदिवस त्यांना पायाखाली ठेचतो मग ते भानावर येतात .तिसरा प्रकार म्हणजे सामान्य माणूस .वाईट मित्रांच्या संगतीला लागतात व टेस्ट म्हणून घेण्याचा मित्र आग्रह करतात व त्या टेस्टची सवय होऊन जाते मग व्यसन लागते व त्या व्यसनापायी आपलेच नाही तर संपू...