तरच आहे अर्थ
कुणाचा खांदा असेल टेकायला
तर रडायला अर्थ आहे
कुणी समजूत घालणारा असेल
तर राग धरायला अर्थ आहे
कुणी वाट पाहणारे असतील
तर घरी जायला अर्थ आहे
कुणी कदर करणारे असतील
तर काम करायला अर्थ आहे
कुणी मान ठेवणारे असतील
तर पाहूणे जायला अर्थ आहे
पाहूण्यांचा मान ठेवणार असतील
तर पाहूणे घरी यायला अर्थ आहे
पैशांचा विनियोग चांगला असेल
तर पैसे कमवायला अर्थ आहे
प्रेमाची माणसे असतील
तर भेटवस्तू आणायला अर्थ आहे
बी रुजणार असेल तर
पाऊसाला अर्थ आहे
प्रेम आपसात असेल
तर जवळ राहण्याला अर्थ आहे
दुसर्याच्या उपयोगी पडणार असेल
तर शक्तीला अर्थ आहे
मुखात चांगले शब्द असतील
तर बोलण्याला अर्थ आहे
नात्यात स्वार्थ नसेल
तर नात्याला अर्थ आहे
आपुलकी असेल नात्यात
तर नाते टिकवायला अर्थ आहे
फसगत नसेल मैत्रीत
तर मैत्री ठेवण्यात अर्थ आहे
चांगल्या मार्गावर चालत असतील
तर मित्रांना अर्थ आहे
प्रामाणिकपणा नोकरी व्यवसायात असेल
तर नोकरी व्यवसाय करायला अर्थ आहे
आवड असेल असलेल्या गोष्टीत
तर त्या गोष्टी करायला अर्थ आहे
कामं करणार असतील
तर सत्तेला अर्थ आहे
सत्तेचा उपयोग लोकांसाठी असेल
तर लोकांच्या मतांना अर्थ आहे
खड्डे नसतील रस्त्यात
तर रस्त्यांना अर्थ आहे
पेट्रोल डिझेलच्या किंमती आवाक्यात असतील
तर गाड्या चालवायला अर्थ आहे
समजूतदारपणा असेल माणसात
तर वय वाढण्याला अर्थ आहे
मोक्ष मिळणार असेल
तर जन्म घेण्याला अर्थ आहे
व्यसन माणसाला नसतील
तर शिक्षणाला अर्थ आहे
माणूसकी असेल माणसात
तर माणूस म्हणून अर्थ आहे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment