सत्य पण असते असत्य आपण जर बघितले तर पृथ्वीचे अस्तित्व विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे कारण पृथ्वीच्या कैकपटीने मोठे ग्रह विश्वात आहेत .पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे व ती फिरते आहे .ती अधांतरी आहे व फिरते आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात काम करत असतांना दिसत नाही व तसा विचारही मनात येत नाही .अशा अधांतरी पृथ्वीवर अनेक लढाया झाल्या .अनेक महापुरुष जन्माला आलेत .जी पृथ्वी विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे त्या पृथ्वीवर लोक जमीनीच्या बांधावरुन भांडतांना दिसतात.अशा पृथ्वीवर चार पाच बंगले मोठा अधिकारी म्हणून अहंकार जो घुसतो तो उतरणे शक्य नाही.जो सूर्य दिसतो तो उगतांना व मावळतांना दिसतो पण तसे काही नसते कारण तो स्थिर आहे व हे दिसणे पण आभास आहे सत्य नाही.पुढील बर्याच वर्षाची माणूस चिंता करतो पण पुढील क्षणाला काय होईल हे त्याला माहीत नसते .जेव्हा माणसाला वाटते माझी इनिंग संपली आहे .सर्व मी मिळवले पण पुढचा क्षण असा काही येतो की माणसाला वाटते माझी खरी इनिंग आता सुरु झाली.जे मिळवायचे त्यासाठी नैतिक मार्गाने प्रयत्न करावा व जे मिळाले ते टिकुन रहावे यासाठी देवाकडे प्रार्थना करावी व जे मिळाले त्...