Skip to main content

Posts

व्यसन

व्यसन व्यसन हे तीन प्रकारचे लोक करतात. पहिला प्रकार संसारातील अनेक संकटांनी त्याचे मन सैरभैर झाले असेल .बायको सोडून गेली असेल किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा व्यवहारात तोटा झाला असेल किंवा नोकरी गेली असेल किंवा हातून चुकीची गोष्ट झाली असेल .भाऊबंदानी छळले असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा गरीबी पिच्छा सोडत नसेल किंवा लग्न होत नाही किंवा अपमान सहन करण्याची ताकद नसेल असे नाना प्रकारचे कारणे असतात व ते विसरण्यासाठी लोक व्यसन करतात .दुसर्‍या प्रकारचे लोक म्हणजे अतिशय श्रीमंत ,कुठे पैसा ठेवावा हे त्यांना कळत नाही म्हणून त्या पैशाचा उपयोग इकडे पार्टी कर तिकडे पार्टी कर मग अशा पार्टींमध्ये व्यसन लागते त्यामुळे अनेक श्रीमंत घराण्यातील मुले हे पैसे भरपूर असल्यामुळे वाया जातात व त्यामुळे जगण्याचे तारतम्य विसरतात .पैशाला पायाखाली तुडवतात मग हाच पैसा एकदिवस त्यांना पायाखाली ठेचतो मग ते भानावर येतात .तिसरा प्रकार म्हणजे सामान्य माणूस .वाईट मित्रांच्या संगतीला लागतात व टेस्ट म्हणून घेण्याचा मित्र आग्रह करतात व त्या टेस्टची सवय होऊन जाते मग व्यसन लागते व त्या व्यसनापायी आपलेच नाही तर संपू...

मातीचे पुतळे

सावधानता जीवनात सावधानता घेणे फार गरजेचे असते ते सुद्धा आपल्याकडे सर्वकाही असतांना .कशाचीच कमतरता जेव्हा नसते .जे पाहिजे ते दुसर्‍या क्षणाला आपल्यापुढे हजर होते म्हणजेच घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते .सुख हे नदीसारखे वाहत असते .घरात आनंदी आनंद असतो तेव्हा माणूस बेसावध होतो .डोळ्यांवर बेसावधची पट्टी येते व ती केव्हा येते ते काहीच कळत नाही म्हणून तर काही श्रीमंताची मुले नशेमध्ये अडकतात .नशेच्या आहारी जातात व तेथेच सर्व असूनही जीवन बरबाद होते .बर्‍याच वेळा पार्टीसाठी गाडी घेऊन जातात .दारु पिऊन गाडी भरघाव चालवतात त्यात स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात टाकतात .वाईट संगतीच्या नादी लागून विविध व्यसने जडतात व नको ते आजार किंवा कोर्ट कचेर्‍या यातच जीवनाचे महत्वाचे वर्ष निघून जातात .गरीबी असते तेव्हा पैसे नसल्याने माणूस सावधच असतो पण पैसा आल्याने माणूस बेसावध होतो व नको ते झंझट पाठीमागे लागते व एकामुळे सर्व कुटुंबातील सदस्यांना मनस्ताप होतो  म्हणून खिशात पैसे खुळखुळ्यावर जास्तच सावधपणा असणे गरजेचे आहे  कारण खिशात पैसा असला की बेसावधपणे माणूस नको तेथे त्याचा उपयोग करतो व संकट ओढवून घे...

सावधानता

तरच अर्थ आहे

तरच आहे अर्थ कुणाचा खांदा असेल टेकायला तर रडायला अर्थ आहे कुणी समजूत घालणारा असेल तर राग धरायला अर्थ आहे कुणी वाट पाहणारे असतील तर घरी जायला अर्थ आहे कुणी कदर करणारे असतील तर काम करायला अर्थ आहे कुणी मान ठेवणारे असतील तर पाहूणे जायला अर्थ आहे पाहूण्यांचा मान ठेवणार असतील तर पाहूणे घरी यायला अर्थ आहे पैशांचा विनियोग चांगला असेल तर पैसे कमवायला अर्थ आहे प्रेमाची माणसे असतील तर भेटवस्तू  आणायला अर्थ आहे बी रुजणार असेल तर पाऊसाला अर्थ आहे प्रेम आपसात असेल तर जवळ राहण्याला अर्थ आहे दुसर्‍याच्या उपयोगी पडणार असेल तर शक्तीला अर्थ आहे मुखात चांगले शब्द असतील तर बोलण्याला अर्थ आहे नात्यात स्वार्थ नसेल तर नात्याला अर्थ आहे आपुलकी असेल नात्यात तर नाते टिकवायला अर्थ आहे फसगत नसेल मैत्रीत तर मैत्री ठेवण्यात अर्थ आहे चांगल्या मार्गावर चालत असतील तर मित्रांना अर्थ आहे प्रामाणिकपणा नोकरी व्यवसायात असेल तर नोकरी व्यवसाय करायला अर्थ आहे आवड असेल असलेल्या गोष्टीत तर त्या गोष्टी करायला अर्थ आहे कामं करणार असतील तर सत्तेला अर्थ आहे सत्तेचा उपयोग लोकांसाठी असेल तर लोकांच्या मतांना अर्थ आहे खड्डे नसतील र...

रंगमंच

जग आहे एक रंगमंच जगात कुणी आहेत श्रीमंत तर कुणी आहेत गरीब कुणी आहेत अपंग तर कुणात नाही कमीची बाब कुणी आहेत उदार तर कुणी आहेत स्वार्थी कुणी आहेत मतलबी तर कुणी आहेत निस्वार्थी कुणी आहेत गोरे तर कुणी आहेत काळे कुणी आहेत सडपातळ तर कुणाला उठवावं लागते बळेबळे कुणी आहेत गुंड तर कुणी आहेत सज्जन कुणी आहेत चोर तर कुणी आहेत दुर्जन कुणी आहेत उंच तर कुणी आहेत बुटके कुणी जगतात आरामात तर कुणाला बसतात चटके कुणी जगतो स्वत:साठी सर्व नियम धाब्यावर ठेवून कुणी जगतो दुसर्‍यासाठी तन मन धन अर्पूण कुणी आहेत नोकरी करणारे तर कुणी आहेत बेरोजगार कुणी करतात व्यवसाय तर कुणात भरला आळस फार जग आहे एक रंगमंच आपल्या भूमिका वठविण्यासाठी त्या फक्त भूमिका आहेत हे विसरु नये आपल्यासाठी जन्म आणि मृत्यू आहेत सुरवात आणि शेवट रंगमंचाची आपली भूमिका  टिपण्यासाठी  तयारी आहे नियतीची प्रा. दगा देवरे

असणे ते नसणे

असणे ते नसणे जे दिसत असते  ते खर्‍या अर्थाने नसते दिसते ते असते आभास तेच माणसाला खरे वाटते जे असते खरे ते सगळ्यांना नाही दिसत खोट्या गोष्टी खर्‍या समजुन रममाण होताना दिसतात जे आज डोळ्यांना दिसते ते काही दिवसांनी नसते जे होते तो भास होता का असे प्रश्न पडायला सुरवात होते खरे  नेमके असते काय हेच नाही समजले खर्‍याच्या भ्रमात माणसे गोंधळून मात्र गेले मी आणि माझे  माणूस  मानत राहिला सत्य ते आहे मात्र वेगळे संत सांगत राहीले सत्य खोट्या गोष्टीच्या चक्रात माणूस विसरला सत्य मी व माझी माणसे  यांच्या सुख दु:खात रमतो नित्य माणूस होतो दिसेनासा संसार राहतो जागेवर काही क्षणांपुरताच होता माणूस मन मानायला नसते हे तयार मृत्यूनंतर कुठे जातो धर्म सांगतात वेगवेगळे ठामपणे कुणालाच नाही माहीत तर्क लावतात आगळेवेगळे प्रा. दगा देवरे

समुद्र व माणूस

माणूस व समुद्र माणसाची व समुद्राची तुलना केली तर बरेच साम्य आढळते .समुद्राला किनारा असतो तसा माणसाला जन्म असतो .समुद्राच्या किनार्‍यावर उभे राहिले तर दुसरा किनारा त्याचा दिसत नाही त्याचप्रमाणे जन्माची तारीख माहीत असते पण मरण कधी हे त्या किनार्‍यासारखे  दिसत नाही .समुद्रात लाटा ह्या चालूच असतात .कधीच समुद्र शांत नसतो .कधी लाटा छोट्या असतात तर कधी त्या एवढ्या मोठ्या असतात की किनारा सोडून पाणी वाहते त्याचप्रमाणे माणसाचे जीवन कधीच शांत नसते .सुख व दु:ख यांच्या लाटा सतत त्याच्या जीवनात येत असतात कधी कधी सुख व दु:ख एवढ्या मोठ्या प्रमाणात येते की माणूस आपले अस्तित्व विसरतो की काय असे त्याला वाटू लागते .समुद्राचे पाणी भरपूर असते पण पिण्याला ते उपयोगाचे  नसते तसेच माणसाच्या जीवनात  सुख भरपूर असते पण त्या सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात नसतो म्हणून सुख राहूनही ते त्याला दृष्टिकोनामुळे उपभोगता येत नाही .समुद्रात अनेक प्रकारचे जलचर असतात व ते मजा मारतात त्याचप्रमाणे माणसाच्या जीवावर अनेक प्रकारचे प्राणी जगत असतात व माणूस हा त्यांचा आधार असतो.माणसाचे मन समुद्रासारखे असते पण ते त्...