Skip to main content

Posts

आनंद

आनंद आहे कुठे प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो पण खरा आनंद कसा मिळवावा हे मात्र माहीत नसते .भौतिक गोष्टी जमविण्यात माणसाला आनंद वाटतो पण तो आनंद टिकत नाही कारण भौतिक गोष्टी कधीतरी बिघडतात व त्यावेळी त्याला दु:ख होते म्हणून भौतिक गोष्टी कायमस्वरुपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तसेच काही व्यक्तींमूळे आपल्याला आनंद होतो पण तो ही टिकत नाही कारण ती व्यक्ती आपल्यापासून कधीपण दूर जाऊ शकते काहीतरी बिनसल्यामुळे किंवा या जगातून ती व्यक्ती गेल्यामुळे. मग व्यक्तीमुळे ,भौतिक गोष्टीमुळे आनंद कायम राहत नाहीत बर्‍याच वेळा ज्या गोष्टी आपल्या खूप जवळ असतात मग त्या व्यक्ती असो नाहीतर वस्तू त्या जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्याकडून दु:ख मिळत राहते कारण  त्या आपल्याजवळ असल्याने आपण जास्त अपेक्षा धरतो व त्या अपेक्षांची पूर्ति झाली नाही की मग आपल्याला दु:ख होते .आता खरा आनंद कोणापासून मिळेल याचा विचार करु.खरा आनंद आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो .आपण त्या गोष्टीचा कसा विचार करतो कोणत्या बाजूने विचार करतो यावर अवलंबून असतो .प्रत्येक गोष्टीत चांगले व वाईट असते तर आपण जर चांगले बघण्याचा ...

हसरा चेहरा

हसरा चेहरा काही जण असतात गंभीर जसे जगाचे संकट त्यांच्यावरी हसणे त्यांना नसते माहीत सतत दिसते चिंता चेहर्‍यावरी आपला चेहरा हसरा ठेवणे  त्यांना वाटते आपला वचक जाणे आपल्याला बघितल्यावर सतत दुसर्‍याला आपली भीती वाटणे हसरा चेहरा असतो चांगल्या आरोग्याची पावती आपला हसरा बघून जुळतात दुसर्‍याशी चांगली नाती माणूस आतून असेल आनंदी त्याची झलक दिसते चेहर्‍यावर उगीचच कोणते टेंशन न घेता विरझन घालू नये आपल्या आनंदावर बरेच बाॅस लोक  विसरतात खूर्ची मिळाल्यावर हसणे सतत कामाचे ओझे घेऊन विसरतात खरे जीवन जगणे हसरा माणूस प्रत्येकाला हवा हवासा नेहमी वाटतो गंभीर माणसापासून प्रत्येकजण दोन हात लांबच राहतो माणसा जवळ असावी कला सर्व परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी देव काढत असतो सतत फोटो छान अल्बम तयार करण्यासाठी लहान मुल प्रत्येकाला आवडते कारण ते असते सतत हसत निरागस त्याचे हसणे बघून आपल्याला भान विसरायला होतं काही माणसाचे हसणे असते कृत्रिम दुसर्‍याला फक्त दाखविण्यासाठी दुसर्‍याला नेहमी कमी दाखवून हसतात फक्त खिजविण्यासाठी हसण्याला असावी मर्यादा लोक काढतात वेड्यात हसण्याने होऊ नये दुसर्‍याला त्रास याचे भान ठेवाव...

भेट

भेट आपल्या प्रिय माणसांची भेट घ्यायला नेहमीच आवडते आपल्याला  नवीन उर्जा मिळते भेटीतून उत्साह वाटतो जगायला निस्वार्थ भेटीने माणूस नाचतो आनंदाने तो स्वत:ला विसरतो आपल्या माणसाच्या प्रेमाने काही वेळा होते जीवनात अनपेक्षित असलेली भेट राहते नेहमी लक्षात कोणतेही नसलेली अट बर्‍याच भेटी होतात काहीतरी ठेऊन अपेक्षा टेंशन येते माणसाला अशी भेट होऊ नये ही इच्छा काहींची भेट असते कधीच न विसरणारी ती  भेट  असते नेहमी आनंद देणारी   काहीं जणांची भेट  ठरते कामाच्या धावपळीची कल्पना केलेली नसते  ही भेट असेल शेवटची स्बत:चीच स्वत:शी भेट होणे हे असते दुर्लभ ते जमते साधूसंतांना म्हणून होत नाही त्यांना कोणता लोभ काहींची भेट न होणे हे असते चांगले उगीचच होतो डोक्याला ताप बरे असते ते न दिसलेले प्रा. दगा देवरे

कामात राम

कामातच आहे राम रोज प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी काम असते.काहीजण सकाळ पासून रात्रीपर्यंत काम करत असतात.काही रात्री पण कामाला जातात .आपल्याला रोज काहीतरी काम असणे हे भाग्याचे लक्षण आहे .आपल्याशिवाय ते काम चांगले कुणी करु शकत नाही ही अजून चांगली गोष्ट आहे .काहीजण काम करायचे म्हणून करतात त्यात perfect पणा नसतो म्हणून ते काम यशस्वी होत नाही .कुणी करत नाही म्हणून मी करतो आहे अशी भावना ठेवली तर ते काम चांगले कसे होणार? माझ्या वाट्याला एखादे काम आहे ते प्रामाणिकपणे समर्पण करुन केले तर त्याचे ओझे वाटत नाही व ते यशस्वी होते आणि त्यामुळे आपल्याला आनंद निर्माण होतो .काहीजण आनंदासाठी काम करतात .त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो तर ते काम आपण ओझे न वाटता पूर्ण समर्पण देऊन केले पाहिजे.काहीजण फक्त हजेरी लावतात आणि काम करायला टाळाटाळ करतात पण सांगताना अभिमानाने सांगतात की मला एवढा मोठा पगार आहे पण त्या पगाराला साजेसे ते काम किती प्रामाणिकपणे समर्पणाने  केले आहे याचा विचार करावा.काही जणांचे ठरलेले असते की नेहमी कामावर उशिरा जायचे व गेल्यावर काम चुकारपणा करायचा पण नियतीकडे आपल्या कर्माचा हिशोब असतो...

विचारांचा जुलाब

विचारांचा जुलाब जेव्हा आपणनको ते खातो ते शरीरात पचन झाले नाही म्हणजेच शरीराला मानवले नाही तर शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपले पोट बिघडते त्याला आपण जुलाब म्हणतो तसेच नको ते विचार मनात आलेत व त्यांची गर्दी जेव्हा मनात होते आणि ते विचार मनाच्या विरोधी असतात अशावेळी त्या विचारांना विचारांचा जुलाब झाला असे म्हणू शकतो व हा जुलाब जेव्हा होतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो .मन सैरभैर होते .कशात लक्ष लागत नाही .कोणतेही काम सहज रितीने होत नाही.माणसाच्या हातून चुका व्हायला सुरवात होते.मन थार्‍यावर नसते .ह्या जुलाबामूळे मानसिक टेंशन होते तसेच रक्तदाबाचा त्रास सुरु होतो व अनेक रोग बाहेर डोकं काढतात असा विचारांचा जुलाब होऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोण खूप महत्वाचा असतो .भविष्यांची चिंता व भूतकाळातील घटना यांचे चिंतन न करता वर्तमानात जगावे  व आलेल्या समस्येतुन कसा मार्ग काढता येईल याचा विचार करावा तसेच आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .बोलण्यावर नियंत्रण असावे  मी आहे म्हणून सर्व चालू आहे हा भ्रम काढून टाकावा व मलाच सर्व ज्ञान आहे हा गैरसमज काढून टा...

वाढदिवस

वाढदिवस बर्‍याच जणांचा असतो वाढदिवस एक आणि दोन जूनला गुरुजींचीच कृपा त्यांच्या मर्जीनेच घातले शाळेला काहींचे वर्ष पुढे केले तर काहींचा मागे झाला रेटा काही नोकरदारांचा झाला फायदा तर काहींचा झाला तोटा एकाच घरात सर्वांचा वाढदिवस साजरा होतो एकाच दिवशी अनेक पार्टींचे पैसे तेवढे वाचतात आणि शुभेच्छा मिळतात फक्त एकाच दिवशी शाळेत मुलाला टाकले हिच झाली कृपा गुरुजींची  मुले झाली सारी साक्षर धुळ लावावी कपाळाला त्यांच्या पायांची शिक्षणाला महत्व दिले गुरुजींनी म्हणून लोकं पोहचली मोठ्या पदावर काही करतात गुरुजींची टिंगल मन नसते तेव्हा भानावर गुरुजी होते आपल्या जीवनात म्हणून सारी सुखे आपण चाखतो त्यांना जीवनातून वजा केल्यावर काहीच नसते असे मी म्हणतो जून महिना व वाढदिवस यासाठीच येते आठवण गुरुजींची त्यांनी दिलेले ज्ञान व संस्कार यातून आठवण ठेवावी त्यांची दगा देवरे