Skip to main content

कामात राम

कामातच आहे राम

रोज प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी काम असते.काहीजण सकाळ पासून रात्रीपर्यंत काम करत असतात.काही रात्री पण कामाला जातात .आपल्याला रोज काहीतरी काम असणे हे भाग्याचे लक्षण आहे .आपल्याशिवाय ते काम चांगले कुणी करु शकत नाही ही अजून चांगली गोष्ट आहे .काहीजण काम करायचे म्हणून करतात त्यात perfect पणा नसतो म्हणून ते काम यशस्वी होत नाही .कुणी करत नाही म्हणून मी करतो आहे अशी भावना ठेवली तर ते काम चांगले कसे होणार? माझ्या वाट्याला एखादे काम आहे ते प्रामाणिकपणे समर्पण करुन केले तर त्याचे ओझे वाटत नाही व ते यशस्वी होते आणि त्यामुळे आपल्याला आनंद निर्माण होतो .काहीजण आनंदासाठी काम करतात .त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो तर ते काम आपण ओझे न वाटता पूर्ण समर्पण देऊन केले पाहिजे.काहीजण फक्त हजेरी लावतात आणि काम करायला टाळाटाळ करतात पण सांगताना अभिमानाने सांगतात की मला एवढा मोठा पगार आहे पण त्या पगाराला साजेसे ते काम किती प्रामाणिकपणे समर्पणाने  केले आहे याचा विचार करावा.काही जणांचे ठरलेले असते की नेहमी कामावर उशिरा जायचे व गेल्यावर काम चुकारपणा करायचा पण नियतीकडे आपल्या कर्माचा हिशोब असतो व वेळ आल्यावर तो चुकता करावाच लागतो .आता काहीजणांना कामच नसते .गावातील शहरातील काहीजण रिटायर असतात तसेच तरुण मुले कोणतेही काम करतांना दिसत नाही .काय काम करायचे हा मोठा प्रश्न असतो मग ह्या चौकात बसा त्या चौकात बसा व बसून राजकारणावर बोलणार क्रिकेटवर बोलणार व timepass करणार कारण काही कामच नाही .ज्याला काही कामच नाही त्याच्या सारखा अभागी तोच .काम करायला बाहेरच पडले पाहिजे असे नाही घरात बसूनही काहीजण काम करतात .ज्यांना काम नाही असे लोक इकडच्या काड्या तिकडे व तिकडच्या काड्या इकडे असे करुन दोन जणांमध्ये  भांडणे लावायचे काम करतात व नामानिराळे राहतात  .काहीजण अनेक चांगले छंद जोपासतात व त्यामुळे स्वत:आनंदी राहतात व इतरांना आनंद देतात म्हणून माणसाला रोज काम असावे व त्या कामामुळे अर्थाजन होऊन स्वत:ला व इतरांना चांगला उपयोग व्हावा .अर्थाजन जरी नसेल तरी आपल्या कामामुळे इतरांना उपयोग व्हावा ,आनंद त्यांना वाटावा . काहीजण आयुष्यभर काम करत असतात कारण कामाशिवाय त्यांना करमत नाही .आपल्याला काहीही काम नसणे ही अभिमानाची किंवा सुखाची गोष्ट नाही  .काहीजण कामाचा अतिताण आलेला असल्याने सुट्टी घेऊन फिरायला जातात व फिरायला जाणे हे पण एक कामच आहे त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो व आपण जे पैसे खर्च करतो त्या पैशांचा इतरांना उपयोग होतो .इतरांना लुबाडून केलेले काम हे काम नसते त्यापेक्षा न केलेले बरे. काही जणांच्या नुसत्या अस्तित्वाने इतरांना कामाची प्रेरणा मिळते  .हुरूप मिळतो .त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने इतरजण चांगले काम करतात व असे असेल तर ते ही कामच आहे  . आपण धडधाकट असूनही आपला उपयोग कुणालाच नाही यासारखे दुर्देव्य कोणते नाही. नुसते बसून दिवस घालवणे म्हणजे आयुष्य संपल्यासारखेच असते व आपण फक्त पृथ्वीवरचा भार आहोत का? याचा विचार करावा .बघा पटतं का?
दगा देवरे सर
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...