Skip to main content

Posts

cod connection

connection परमेश्वर नेहमी आनंदी समाधानी असतो .आपण त्याचाच एक अंश आहे .ज्यावेळी आपण आनंदी समाधानी असतो तेव्हा समजावे की त्याच्याशी आपले connection जुळलेले आहे .तो म्हणजे input व आपण असतो output .input व output मध्ये connection असेल तर जे input मध्ये आहे ते output मध्ये नक्की येणार पण जेव्हा त्या connection मध्ये कचरा साठला असेल तर त्याने कितीही input पाठवले ते output पर्यंत येऊच शकणार नाही .आपण संसारातील राग द्वेष मत्सर चिंता हेवेदावे  लालसा बदला याने एवढे भरुन गेलेलो आहोत की त्याच्याकडून येणारा आनंद समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे आपण नेहमी छोट्या मोठ्या गोष्टींनी दु:खी होतो व सर्व असूनही समाधान आपल्याला मिळत नाही कारण input व output मध्ये जी cod असते ती  संसारातील अवगुणांनी  खराब झाली आहे किंवा तुटली आहे म्हणून परमेश्वराकडून आनंद व समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे ज्याचे  connection त्याच्याशी जुळलेलेले असते तो माणूस जीवनात नेहमी प्रसन्न आनंदी समाधानी दिसतो.कोणत्याही गोष्टीनी तो विचलीत होत नाही कारण connection असल्यामुळे त्याला एक भक्कम आधार व...

फक्त एक दिवस

फक्त एक  दिवस qqqआपल्याला एका दिवसाचे महत्व दैनंदिन जीवनात काहीही नसते पण असे काही घडते की त्यामुळे आपल्याला त्यासाठी फक्त एक दिवस हवा असतो.आपल्या माणसांना आपण गृहीत धरत असतो .आपल्याशिवाय त्याला कोण आहे व तो आपल्याकडेच येणार कुठेही जाणार नाही अशा भावनेने आपण त्या व्यक्तीशी  वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याकरिता कितीही चांगले केले असेल तरी त्याची आठवण आपण ठेवत नाही व qqत्याबदल्यात त्या व्यक्तीवर प्रेम, तिची काळजीq ,तिला काय हवे व काय नको याचा विचारही आपल्या मनात नसतो .तिने जे केलेले असते त्याची कदर आपल्याला नसते .आपण वेगळ्याच धुंदीत वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याजवळ एखाद्या गोष्टीची मागणी केली तर आपण त्या मागणीकडे कानाडोळा करतो व  आताच कशाला हवे ,करु नंतर कधीतरी अशा विचारात असतो असे त्या व्यक्तीबरोबर अनेक वर्ष निघून जातात पण तिची किंमत आपल्या ध्यानीमनी नसते मग एक दिवस अचानक ती व्यक्ती आजाराने ,अपघाताने आपल्यातून निघून जाते .आपण कधीही कल्पना केलेली नसते की अचानक ती निघून जाईल म्हणून मग आपले डोळे खाडकन उघडतात व त्या व्यक्तीचे महत्व आपल्याला जाणवायला लागते .तिची पोकळी आपल्य...

आनंद

आनंद आहे कुठे प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो पण खरा आनंद कसा मिळवावा हे मात्र माहीत नसते .भौतिक गोष्टी जमविण्यात माणसाला आनंद वाटतो पण तो आनंद टिकत नाही कारण भौतिक गोष्टी कधीतरी बिघडतात व त्यावेळी त्याला दु:ख होते म्हणून भौतिक गोष्टी कायमस्वरुपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तसेच काही व्यक्तींमूळे आपल्याला आनंद होतो पण तो ही टिकत नाही कारण ती व्यक्ती आपल्यापासून कधीपण दूर जाऊ शकते काहीतरी बिनसल्यामुळे किंवा या जगातून ती व्यक्ती गेल्यामुळे. मग व्यक्तीमुळे ,भौतिक गोष्टीमुळे आनंद कायम राहत नाहीत बर्‍याच वेळा ज्या गोष्टी आपल्या खूप जवळ असतात मग त्या व्यक्ती असो नाहीतर वस्तू त्या जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्याकडून दु:ख मिळत राहते कारण  त्या आपल्याजवळ असल्याने आपण जास्त अपेक्षा धरतो व त्या अपेक्षांची पूर्ति झाली नाही की मग आपल्याला दु:ख होते .आता खरा आनंद कोणापासून मिळेल याचा विचार करु.खरा आनंद आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो .आपण त्या गोष्टीचा कसा विचार करतो कोणत्या बाजूने विचार करतो यावर अवलंबून असतो .प्रत्येक गोष्टीत चांगले व वाईट असते तर आपण जर चांगले बघण्याचा ...

हसरा चेहरा

हसरा चेहरा काही जण असतात गंभीर जसे जगाचे संकट त्यांच्यावरी हसणे त्यांना नसते माहीत सतत दिसते चिंता चेहर्‍यावरी आपला चेहरा हसरा ठेवणे  त्यांना वाटते आपला वचक जाणे आपल्याला बघितल्यावर सतत दुसर्‍याला आपली भीती वाटणे हसरा चेहरा असतो चांगल्या आरोग्याची पावती आपला हसरा बघून जुळतात दुसर्‍याशी चांगली नाती माणूस आतून असेल आनंदी त्याची झलक दिसते चेहर्‍यावर उगीचच कोणते टेंशन न घेता विरझन घालू नये आपल्या आनंदावर बरेच बाॅस लोक  विसरतात खूर्ची मिळाल्यावर हसणे सतत कामाचे ओझे घेऊन विसरतात खरे जीवन जगणे हसरा माणूस प्रत्येकाला हवा हवासा नेहमी वाटतो गंभीर माणसापासून प्रत्येकजण दोन हात लांबच राहतो माणसा जवळ असावी कला सर्व परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी देव काढत असतो सतत फोटो छान अल्बम तयार करण्यासाठी लहान मुल प्रत्येकाला आवडते कारण ते असते सतत हसत निरागस त्याचे हसणे बघून आपल्याला भान विसरायला होतं काही माणसाचे हसणे असते कृत्रिम दुसर्‍याला फक्त दाखविण्यासाठी दुसर्‍याला नेहमी कमी दाखवून हसतात फक्त खिजविण्यासाठी हसण्याला असावी मर्यादा लोक काढतात वेड्यात हसण्याने होऊ नये दुसर्‍याला त्रास याचे भान ठेवाव...

भेट

भेट आपल्या प्रिय माणसांची भेट घ्यायला नेहमीच आवडते आपल्याला  नवीन उर्जा मिळते भेटीतून उत्साह वाटतो जगायला निस्वार्थ भेटीने माणूस नाचतो आनंदाने तो स्वत:ला विसरतो आपल्या माणसाच्या प्रेमाने काही वेळा होते जीवनात अनपेक्षित असलेली भेट राहते नेहमी लक्षात कोणतेही नसलेली अट बर्‍याच भेटी होतात काहीतरी ठेऊन अपेक्षा टेंशन येते माणसाला अशी भेट होऊ नये ही इच्छा काहींची भेट असते कधीच न विसरणारी ती  भेट  असते नेहमी आनंद देणारी   काहीं जणांची भेट  ठरते कामाच्या धावपळीची कल्पना केलेली नसते  ही भेट असेल शेवटची स्बत:चीच स्वत:शी भेट होणे हे असते दुर्लभ ते जमते साधूसंतांना म्हणून होत नाही त्यांना कोणता लोभ काहींची भेट न होणे हे असते चांगले उगीचच होतो डोक्याला ताप बरे असते ते न दिसलेले प्रा. दगा देवरे

कामात राम

कामातच आहे राम रोज प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी काम असते.काहीजण सकाळ पासून रात्रीपर्यंत काम करत असतात.काही रात्री पण कामाला जातात .आपल्याला रोज काहीतरी काम असणे हे भाग्याचे लक्षण आहे .आपल्याशिवाय ते काम चांगले कुणी करु शकत नाही ही अजून चांगली गोष्ट आहे .काहीजण काम करायचे म्हणून करतात त्यात perfect पणा नसतो म्हणून ते काम यशस्वी होत नाही .कुणी करत नाही म्हणून मी करतो आहे अशी भावना ठेवली तर ते काम चांगले कसे होणार? माझ्या वाट्याला एखादे काम आहे ते प्रामाणिकपणे समर्पण करुन केले तर त्याचे ओझे वाटत नाही व ते यशस्वी होते आणि त्यामुळे आपल्याला आनंद निर्माण होतो .काहीजण आनंदासाठी काम करतात .त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो तर ते काम आपण ओझे न वाटता पूर्ण समर्पण देऊन केले पाहिजे.काहीजण फक्त हजेरी लावतात आणि काम करायला टाळाटाळ करतात पण सांगताना अभिमानाने सांगतात की मला एवढा मोठा पगार आहे पण त्या पगाराला साजेसे ते काम किती प्रामाणिकपणे समर्पणाने  केले आहे याचा विचार करावा.काही जणांचे ठरलेले असते की नेहमी कामावर उशिरा जायचे व गेल्यावर काम चुकारपणा करायचा पण नियतीकडे आपल्या कर्माचा हिशोब असतो...