मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं बहिणाबाईंनी मनाचे वर्णन फार चांगल्या प्रकारे केले आहे.मन माणसावर नेहमी आरुढ होत असते.जसे मन सांगेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो .मनामागे माणूस फरफटत जातो .जर मनाचे विचार चांगले असतील तर मग चांगला मार्ग सापडतो व माणसाचे कल्याण होते पण जर मनातील विचार चांगले नसतील तर मग मात्र माणसाचे अतोनात नुकसान होते .छोट्या छोट्या गोष्टीवरुन मन माणसाला उकवसते व त्याचे रुपांतर भांडणात होते व अनर्थ घडतो .पाणी जसे नेहमी उताराकडेच धावते तसे मन हे नेहमी वाईट विचार करण्यात मग्न असते .पाण्याला वरच्या बाजूने नेण्यासाठी विशिष्ट मशिनचा उपयोग करुन चढवले जाते त्याचप्रमाणे मनात चांगले विचार हे आपोआप येत नाहीत तर प्रयत्नपूर्वक त्यात आणावे लागतात .त्यासाठी अनेक मार्ग आहेत .मनाची एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे जर काही दिवस एकच गोष्ट नेहमी करत राहिलो तर ती अंगवळणी पडते व मन करायला तयार होते .चांगली गोष्ट असेल तर चांगलेच होते पण वाईट गोष्ट अंगवळणी पडली तर मग मात्र माणसाचे पतन होते.काही दारू, सिगारेट तंबाखू, बिडी, गूटखा खाण्याची सवय लावून घेतात व ब्लू फिल्म ,वासना चाळवणारे व्हिडिओ ...