Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

फोटो

फोटो वाॅटसअपमध्ये फोटो बघतास उडते मनाची धांदळ काय असेल मेसेज खाली यासाठी मनाची होते तळमळ फोटोखाली शुभेच्छा दिसल्यावर मन होतेआनंदी मग बराचवेळा वाॅटसअप बघण्यात मनावर घालता येत नाही बंदी फोटोखाली श्रद्धांजली बघितल्यावर मनाची होते घालमेळ काय झाले असेल असा विचार करत मन विसरते काळवेळ जवळची व्यक्ती गेली कळल्यावर मन होते बैचैन दिवसभर त्याच्याच विचाराने मन होते उदासिन वाॅटसअपवर कुणाचे कौतूक वाचून शुभेच्छा अभिनंदन सहजच करतो त्याच्या परिश्रमाला आपण सलाम करुन जातो काहींचे जाणे वाचल्यावर अश्रूंचे पाट वाहतात त्यांचा चेहरा नेहमी डोळ्यांसमोर येऊन मनात आठवणी दाटतात वाॅटसअप उघडल्यावर काय असेल बातमी  हे कुणाला नाही येणार सांगता ती बातमी बघूनच  मनाची कळणार अवस्था दगा देवरे सर

जीवन एक कथा

जीवन एक कथा खरे पाहिले तर जीवन असते एक कथा.कितीही माणूस मोठा झाला तरी एक दिवस त्याची कथा बनते व ती कथा ऐकायला मिळते .काहींची कथा पराक्रमाची त्यागाची शौर्याची असते तर काहींची कथा दुष्टचक्रांची असते त्याच्या कुकर्माची असते .माणूस एवढा गुंतून जातो की त्याला विसर पडतो की आपली एक दिवशी कथा हो,  ळीनननलतशॅङङ  आहे.काहीजण दुसर्‍याशी एवढे वाईट वागतात की सांगायला नको त्याचे कारण म्हणजे ते विसरतात की आपली कथा होणार आहे .त्याला वाटते की आपण कायमस्वरुपी असणार आहोत   त्यामुळे त्याला लोभ होतो व त्या लोभामुळे जास्तीत जास्त संपत्ती कोणत्याही मार्गाने कशी वाढेल याचा विचार करतो व त्यावेळी आपल्या अवतीभवती असलेल्यांना तो तुच्छ मानतो.काहीजण व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:चा नायनाट करुन घेतात व कथा लवकर बनून जातात .काहीजण संपत्तीवरुन  स्वत:च्याच लोकांशी अबोला धरतात व एक दिवशी अबोला धरणारे व त्यांना अबोला धरायला लावणारे कथा बनून जातात व संपत्ती जागेच्या जागी राहते .ज्यावेळी माणसाला कळेल की आपण जे ही करतो आहोत ती एक दिवशी कथा होणार आहे त्यावेळी माणूस सतत जागृत राहील व आपल्याकडून कोणतेही वाई...

काळ

काळ  काळ बसला आहे टपून संधीची बघतो आहे वाट संधी येताच मारतो झडप नाही बघत रात्रं आणि पहाट नाही बघत बालक आहे की बालिका बघत नाही तो म्हातारा आहे की तरुण बघत नाही स्री आहे की पुरूष असते काळाचे कठोर मात्र मन सामान्य आहे की असामान्य याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नाही वेळ संपताच एखाद्याची उचलून नेतो सारे काही दया याचना चालत नाही काही ज्याला नेले तो परत येत नाही कधी थोड्या काळासाठी असते अस्तित्व माणसाने विचार करावा आधीमधी सौदर्य कुरुप उंच बुटका बारीक जाड त्याच्यापुढे असते समान जैसे कर्म केले तेचि भोगा आले हा कर्माचा सिद्धांत घ्यावा समजून मी मी आणि तू तू करण्यात येते जन्माला आपत्ती मान सन्मान पैसा संपत्ती पद क्षणाचै असतात सोबती लोभामुळे माणूस जातो  काळाच्या जबड्यात लवकर स्वार्थी मन माणसाला सुखापासून ठेवते मात्र दूर कोणतेही कर्म करतांना काळाचे नेहमी स्मरण करावे सतत जागृत राहून माणसाने सत्याला कधीच न विसरावे येतो माणूस एकटा जातोही एकटाच शेवटी असते जीवनाची शून्य बाकी काहीही घेऊन आलेला नसतो जातांनाही नसतो नेत काही दगा देवरे सर