Skip to main content

रूढी लग्नाच्या

लग्नातील रूढी

आजकाल लग्नांचा मौसम चालू आहे .लग्न म्हटल म्हणजे वारेमाप खर्च व नको त्या गोष्टीवर होणारा खर्च.नवर्‍याला बसायला बग्गी व त्याचा खर्च 10000 रूपये फक्त एक तासासाठी एवढा खर्च तसेच वरमाया चा खर्च काही लग्नात दहा तर काही लग्नात वीस काही ठिकाणी तीस चाळीस असतात मग त्यांना साड्या पासून ताट समया टिकल्या बांगड्या त्याचा मान ठेवण्यासाठी बरेच गोष्टी पुरवाव्या लागतात मग कुणीतरी साडी आवडली नाही म्हणून रूसून बसतात लग्नात राडा करतात शुभ कार्यामध्ये अपशकून होतो.नवरा नवरी राहिली बाजूला बाकीच्याच गोष्टीला महत्व.चूकून कुणाचे नाव पत्रिकेमध्ये राहिले तर जीवनभर राग ठेवतात संबंध तोडतात .शुल्लक गोष्टीला महत्व देतात .काही आहेर वरून नाराज होतात.त्याने काय 101 च आहेर केला मी त्याच्या लग्नाला 501 आहेर केला होता यावरून मतभेद .मग मामा लोकांनी असंच केले पाहिजे तसंच केले पाहिजे यावरून मतभेद होतात .लग्न जोडण्यासाठी असते पण एका लग्नामुळे किती तरी नातं तूटून जातात व कितीतरी जोडली जातात .लग्नाला आलेले लोक ही जेवण करताना हावरटसारखे पत्रावळीमध्ये वाढून घेतात व निम्मी अन्न खावून बाकीचे टाकून देतात सुशिक्षित व अशिक्षित लोकांना कोणतीही लाज वाटत नाही अन्न टाकून देतांना .आपल्यावर कोणतेही संस्कार झालेले नाहीत हे ते दाखवून देतात .प्रतिष्ठा जपण्यासाठी वधू कडील मंडळीही कर्ज काढून वारेमाप खर्च करतात.अहो नवरीला सजवण्यासाठी पार्लरवालेही 10000   '20000 रूपये घेतात व आपले नैसर्गिक सौदर्य झाकून डूप्लिकेट सौदर्य दाखवले जाते.एका दिवसा साठी साडी नेसतात फक्त लग्नात पण दहा हजार पासून एका लाखापर्यंत  साड्या विकत घेतात .पूर्ण अंगावर सोने दिसायला पाहिजे लोकांना म्हणून कितीतरी लाखांचे सोने खरेदी करतात.लोकांना दाखवण्यासाठी बर्‍याच वेळेला नको त्या गोष्टीवर खर्च करतात आता डिजे साठी चाळीस हजारा पासून एक लाखापर्यंत मोजतात व लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्वताचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूंच्या लोकांना आवाजाचा किती त्रास होतो याचा जरा सूध्दा विचार केला जात  नाही
       बर्‍याच वेळेला जेवढा नवरा मोठ्या नोकरीला तेवढा भिकारी असतो .हूंड्याची मागणी तो आपल्या पदाला शोभेल तशी मागणी करतो.मुलगी पसंत पडली तरी हुंड्यामुळे ते बिनसतं .स्वताला लाखांच्या वरती पगार मग भिकार्‍या सारखं कशाला हुंड्याची मागणी करतात .काहीजण अमूक तोळे सोने मागतात जणू काही जन्मापासून नोकरीपर्यंत जेवढा बापाने खर्च केला तेवढा वधू पित्याकडून वसूल करण्याचा विडा उचलतात जणू कोणतीही लाज न बाळगत.
एका लग्नामुळे  किती लोक पोसले जातात घोडावाला कपडेवाला सोनार चप्पलवाला आचारी कासार नाव्ही मंडपवाला किराणा दूकानदार बॅन्डवाला पत्रिकावाला ट्रव्हलसवाला पाणीवाला हारवाले छोटे छोटे दूकानदार पेट्रोलवाले हाॅलवाले फर्निचरवाले रंगवाले इलेक्टिकवाले व अजून बरेच जण. ठिक आहे लग्न हा आनंदाचा क्षण असतो आयूष्यात पण साधेपणानेही तो आनंद घेता येतो व संबंध हे वाढायला हवेत .नातेसंबंध घट्ट व्हायला हवेत व कमीत कमी खर्चात ही आनंद घेता येतो बघा जमतं का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...