Skip to main content

आंधळा मूकाव बहिरा

आंधळा मुका व बहिरा

दुष्काळ असूनही न बघितला सारखा करतोस।
का रे अशी पाठआमच्याकडे फिरवलीस।।

लोक पाण्यासाठी त्राही त्राही करतात।
अन तुझा सारखा धावा करतात।।

का रे आंधळा बनण्याचे नाटक करतो।
देवा तुला मी तळमळीने सांगतो।।

लोक तुला सारखे हाका मारतात।
पण तुझे कान त्यावेळी बंद होतात।।

बहिरा होण्याचे करतो  नाटक पुन्हा पुन्हा।
सांग ना असे का वागतोस कान्हा।।

पुर्वी संताबरोबर कायम बोलत होतास।
आज तर तू  आमच्याशी मुका झालास।।

सारा राग  विठ्ठला आता सोड रे।
आम्ही तुझीच सारी लेकरे।।

लाव हात काळ्या ढगांना।
अन पाऊस पाडायचा आदेश दे मेघांना।।

सोड तुझे अंध मुके अन बहिरेपण।
पाऊस पाडून आनंदी होऊ दे सारेजण।।

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...