Skip to main content

वाट पाहणे

वाट पाहणे

जीवनात प्रत्येक जण कुणाची नाही तर कुणाची वाट पाहत असतो.आई बाळाची वाट नऊ महिने  पाहत असते .त्याचा पहिला शब्द ऐकण्यासाठी वाट पाहते .पहिला पाऊल कधी टाकतो त्याची वाट पाहते .तो कधी झोपतो व कधी उठतो याची वाट बघते. त्याची शाळा कधी सुटेल याची वाट बघते आणि हे वाट बघणे तिला खूप आनंद देवून जाते.
  मुले वाट बघतात आपल्या आईबाबांची कामावरून कधी येणार  तसेच आईबाबाही वाट बघतात मुले घरी कामावरुन येण्याची व ह्या वाट बघण्यात एक प्रकारची काळजी असते. चिंता असते.मुलामुलींचे लग्न कधी होणार किंवा नोकरीला कधी लागणार याची बघतात वाट आईवडील.
   आपले सुखाचे दिवस कधी येतील याची बरेच जण वाट पाहतात. एखादा बाॅस वाईट असेल त्रास देत असेल तर त्याच्या निवृतीची बरेच जण वाट पाहत असतात.घरात कुणी आजारी असेल तर तो कधी लवकर बरा होणार याची सर्वजण वाट पाहत असतात.शत्रू लोक समोरच्याचं नुकसान किंवा वाईट बातमीची वाट पाहत असतात.
   कुणी बसची वाट पाहतात तर कुणी ट्रेनची .सर्वजण आपल्या पगाराची वाट पाहतात.कुणी दिवस उजाडण्याची वाट पाहतात तर कुणी रात्र होण्याची वाट पाहतात.काहीजण आपल्या प्रेयसीची वाट पाहतात तर काही जण बायको माहेरी कधी जाईल याची वाट पाहतात .काहीजण बायको माहेरहून कधी येईल याची वाट पाहतात.
   शेतकरी पाऊस कधी येईल याची वाट पाहतो व त्यामालाला भाव चांगला कधी येईल याची वाट पाहत असतो .व्यापारी ही आपल्याला बक्कळ नफा कधी मिळेल याची वाट बघतात.मुके प्राणीही आपल्या मालकाची वाट बघत असतात.राजकारणामध्ये ही बरेच जण आपण कधी मंत्री होणार याची वाट बघत असतात.नालायक मुले संपतीसाठी बापाच्या मरणाची वाट बघतात.
    म्हणजेच सर्वजण कुणाची नाही तर कुणाची वाट बघत असतो .काही वेळा वाट बघणे सुखद तर काहीवेळा वाट बघणे क्लेषदायक असते.विचार करा तुम्हीही कुणाची वाट बघत असतात का व ती बघणे सुखद असते की दु:खद.
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...