नात्यापेक्षा पैसा वरचढ
माणसाच्या आयूष्यात पहिले नाते आले व नंतर पैसा आला .नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्व प्राप्त झाले .आईवडिलांनी मुलामुलींसाठी किती पैसा खर्च केला हे मोठेपणी मुले जाब विचारतात व त्यावरून भांडतात .दिवाळीच्या सणाला आपण एकमेकांना भेटतो हा आनंद मानण्याऐवजी आपल्याला किती किंमतीची साडी घेतली किंवा किती पैसे दिले याच्याकडे जास्त लक्ष दिले जाते .काहीठिकाणी तर योग्य भेटवस्तु मिळाली नाही तर सणासुदीच्या दिवशी भांडणे होतात व सण खराब जातो कारण भेटण्यापेक्षा पैशाला जास्त महत्व आले आहे .एक भाऊ शेतकरी व दुसरा नोकरीला असेल तर बघायलाच नको .तुझंकस चांगल व माझं कसं वाईट असा हेवा करण्यातच आयुष्य घालवतात व तु नोकरीला असल्याने मी जास्त जमीन घेणार किंवा सर्व घेणार असा वाद बर्याच ठिकाणी चालू असतो.काहीठिकाणी आईवडीलांचा सांभाळ कुणी करायचा व त्यासाठी अधिक जमीनीची मागणी किंवा पैशांची मागणी करतात व त्यावरून हमरीतूमरीवर येतात .बर्याच वेळाजमिनीची वाटप करतांना तमाशा करतात .मला हीच जमीन पाहिजे त्यासाठी कोर्टकचेरी सुध्दा करतात .आपल्यातले नाते विसरतात .
लग्नकार्याला येण्यापेक्षा त्यासाठी किती पैशाची मदत किंवा आहेर दिला याला महत्व आले आहे मग त्याने जेवढा आहेर दिला तेवढाच मी त्याच्या लग्नाला देणार असा संकुचित विचार करतात व जीवनभर लक्षात ठेवतात तो आहेर पण नाते नाही .बर्याच ठिकाणी पतीपत्नीमध्ये पैशावरून भांडणे होतात व काहीवेळा तर नाते सुध्दा तुटते .मित्रामध्ये पैशांचा व्यवहार झाला तर त्यापैशांमूळे त्यांचे नातं कायमच तुटते .पैशांमुळे बरेच जवळचे नाते कायमचं तुटतांना दिसतात .पैसा हाच देव झाला आहे व त्यापुढे सर्व नातेसंबंध किस झाड की पत्ती झाली आहे .जोपर्यंत पैशापेक्षा नाते महत्वाचे वाटत नाही तोपर्यंत माणसाची प्रगती झाली असे म्हणता येणार नाही .विचार करा तुमचे नाते पण पैशामुळे तुटले आहे का व नात्यापेक्षा पैशाला जास्त किंमत देता का .बर्याच वेळा माणसाकडे पैसा असतो व काहींना अडचणीच्यावेळेत मदत करायची असते पण तो नातेसंबंध पेक्षा पैसा जास्त जवळचा वाटतो म्हणूनच मदत न करता पैशाला सोडत नाही .काहीवेळा मदत केली जाते पण वापस करायची नियत नसते त्यामूळेही संबंध बिघडतात .बघा व विचार करा की तुम्हीही असे करता का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment