Skip to main content

पोट म्हणजे कचर्‍याचा डबा नव्हे

पोट म्हणजे कचर्‍याचा डबा नव्हे

बर्‍याच लोकांना माहित नाही पोट म्हणजे काय कारण माहित असतं तर त्याच्यात काहीपण भरले नसतं.आपण जे पटापट गिळतो तेव्हा बिचार्‍या जठराला किती त्रास होतो पचन करण्याचा मग तेपण थकतं तेव्हा पोट दुखायला लागते .पोटाचे विकार सूरु होतात.कचर्‍याच्या डब्यामध्ये जशी घाण टाकतो त्याप्रमाणे काही माणसं तोंडात जे दिसेल ते कोंबतात.मग ते कुणी बनवल असेल कस कुठे बनवलं असेल याचा विचार न करता फक्त खायचं काम करतात .कोणत्याही परिणांमा विचार करत नाही .काही दारू पितात मग त्याच्यात काय काय टाकलेलं असते पण तोंड वाकडे करुन कडू का असे ना पितात .एवढं पवित्र तोंड देवाने दिले पण त्यात काहीपण टाकतात .काही सिगारेट बिडीचा धूर कोंबतात .खेकडा असो बोकड असो डूक्कर असो मासे असो बैल असो काही देशात झूरळ साप पाली खातात. मग मला सांगा आपले पोट कचर्‍याचा डबा नाही तर काय व तोंड म्हणजे कचर्‍याचं प्रवेशव्दारच आहे.विचार करा तो परमेश्वर आत बसलेला आहे व तो आत आहे म्हणूनच आपण जीवंत आहोत .मग तोंडात काहीपण कोंबून त्याच्यावरअन्यायच करतो व पर्यायाने आपल्यावरच पण व्यसनाच्या अधीन जावून माणसांची बुध्दी भ्रष्ट होते .पण शेवटी परिणामांना सामोरे जावे लागते .विविध आजारांचे आपले शरीर माहेर घरचं होते व त्यासाठी आयूष्य चांगले जगू शकत नाही.म्हणजेच आपल्या पायांवर आपणच धोंडा पाडतो व म्हणतो माझ्या नशीबातच होतं काय करणार .स्वतावर ताबा नसल्यामुळे स्वताचा नाश तर ओढवून घेतात व त्याबरोबर परीवारालाही दुख:देवून जातात .जस अन्न तस मन .म्हणून खातांना सात्विक खा. जे लोक मांसाहारी खातात त्यांना भाजीपाला खाणे म्हणजे हलक्या प्रतीचे वाटते.मांसाहार करू नका असे नाही सांगत पण लिमिट मध्ये.हे झाले खाण्याच्या बाबतीत.
     दुसरे म्हणजे विचार हे मनाचे खाद्य आहे .जे विचार कराल त्याप्रमाणे मन धावते .जे लोक negative विचार करतात तेव्हा वातावरणातील सर्व negativity त्यांच्याकडे आकर्षिली जाते  व कायम ते त्याच विचारात असतात पण चांगले विचार करणारे माणसे वाईट परिस्थिती मध्ये सुध्दा चांगले शोधतात व मार्ग काढतात .चांगले विचार असले की हातून वाईट सहसा घडत नाही .पण वाईट विचाराने अत्याचार हिंसा घडतात म्हणून आपणच चांगल्या गोष्टी बघीतल्या पाहिजे चांगले वाचण केले पाहिजे .चांगले ऐकले पाहिजे व महत्वाचे चांगल्या विचारांच्या माणसांची संगत केली पाहिजे.काही लोक एसी कारने प्रवास करतात व स्वच्छ मार्गावर खिडकी उघडून पान थुंकतात. विचार करा की तूमचे पोट म्हणजे कचर्‍याचा डबा आहे का ? व मनात कोणते विचार चालू असतात.तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग.आपणच आपल्याशी लढायचं व स्वताशीच जिंकायच.माणूस दुसर्‍याबरोबर जिंकतो पण स्वताशी मात्र हरतो .बघा विचार करा व ठरवा आपले पोट कचर्‍याचा डबा आहे का ? व आपले मन कायम गुंडासारख विचार करतं का ? आणि आपली संगत कशी आहे?

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...