Skip to main content

बांध व भानगडी

बांध व भानगडी

गावाकडे ज्या ज्या ठिकाणी शेती आहे तेथे ह्या गोष्टी बांधाच्या घडतात .अनेक वर्ष कुरबूरी चालूच असतात .एकमेकांचे मुद्दाम बांध फोडतात बांधावरचे झाडे तोडतात व भांडणाला आमंत्रण देतात .वास्तविक जी काही प्रगती करायची ती मध्ये शेतीत करून दाखवायची पण नाही त्यांना बांध फोडून थोडी थोडी जमिन आपल्या हद्दीत करायची असते त्यासाठी आयुष्यभर भानगडी चालल्या तरी चालतील कोर्टकचेर्‍या केल्या तरी चालतील पण ते बांध फोडणारच व बांधावरचे झाडे तोडणारच .सारे आयुष्य हे ह्या कुरबूरीमध्येच घालवतात .याची बकरी काय माझ्या मळ्यात आली याचा बैल काय आला हे सर्व चालतच असते शेजारी म्हणून एकमेकाबद्दल व्देष बाळगतात शहर काय व खेडे काय शैजारी हे चांगले मित्र बहूदा नसतातच .एकमेकांचा हेवा करण्यातच आयूष्य घालवतात .दूसर्‍याची प्रगती म्हणजे यांच्या पोटात गोळा तसेच याच्या घरी कोण आले कोण गेले याच मात्र लक्ष असते कारण काहींना कामधंदाच नसतो मग उरतो तो फक्त टाईमपास व अशा टाईमपासमध्येच सर्व आयूष्य घालवतात
       किती वर्षापासून हे सर्व चालल आहे त्यात काडीमात्र बदल नाही .मानसिकता बदलायला कुणीच तयार नाही एकमेकांचे पाय ओडण्यातच आयूष्य
घालवतात .ऐकमेकाची खूशाली न विचारता फक्त भळभळ नजरेने फक्त बघत राहायचे .गाडीने पण चालू द्यायचे नाही व घोड्याने पण नाही
  शेवटी बांध फोडणारे  बांधावर झाडे तोडणारे जातात पण बांध तेथेच राहतो जमिन तेथेच राहते फूकट त्यापायी आयूष्य बरबाद करुन घेतात ज्यावेळी माणूस ह्या मानसिकतेतून बाहेर येईल तरच तो प्रगती करणार  नाहीतर वर्षोनवर्षौ असच चालू राहणार  .हे करताना चांगले नोकरदार शिक्षित लोकचं जास्त करतात .जरा एक फेरी मारा तेव्हा दिसेल की शेजार हा धर्मच राहिला नाही तो अधर्म झाला .एकमेकांकडे शत्रूराष्टाप्रमाणे बघतात व तसे आचरण करतात .मला वाटतं ही परिस्थिती कधीच बदलणार नाही  .बघूया वाट 

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...