Skip to main content

श्रावण

श्रावण
श्रावण आला श्रावण आला।
आता veg.खाण्याकडे वळा।।

नका करू बोकड कोंबड्यांची चिंता।
थोडे दिवस जगू द्या त्यांना आता।।

श्रावण पाळणारे पाळतात।
नसणार्‍यांना सर्व दिवस सारखेच असतात।।

श्रावणात द्या दारू बियरला सुट्टी।
अन करा वेजची जंगी पार्टी।।

श्रावणातला पाऊस प्रेमासारखा बरसतो।
हौशी माणूस त्याच्यात भिजायला बघतो।।

श्रावणात करावे व्रत वैकल्य।
अन मनातले दूर करावे दुखाचे शैल्य।।

श्रावणातला पाऊस देतो शेतकर्‍यांना आनंद।
कारण शेतीत दरवळतो सगळीकडे सुगंध।।

श्रावण आला तसा जाईल।
त्याच्या गोड आठवणी मात्र राहतील।।

बोकड कोंबड्या मानतील श्रावणाचे आभार।
कारण एक महिना केली त्यांनी मजा भरपूर।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...