Skip to main content

सुगीचे दिवस

सुगीचे दिवस
प्रत्येक जण सुगीच्या दिवसाची वाट पाहत असतो.काहीच्या जीवनात ते दिवस येतात परंतु काहीच्या जीवनात कधीच नाही.पण सुगीचे दिवस म्हणजे काय?घरात भरभराट असणे म्हणजे सुगीचे दिवस? मला वेगळे सांगायचे आहे सुगीच्या दिवसांबद्दल .तुमच्या घरी भरपूर आलबेल असेल पण त्याचा उपभोग घेता येत नसेल तर त्याचा काय उपयोग.तुमचे शरीर जेव्हा निरोगी असेल  तेव्हाच तुम्ही त्याचा उपभोग घेणार.दररोज योगा व्यायाम  यांची साथ केली तर शरीर निरोगी राहण्यास मदत होईल .ज्या गोष्टींमुळे शरीर रोगाचे माहेर घर होईल ते खाणे टाळणे .खाण्याबद्दल माहीती मिळवून योग्य संतुलित आहार योग्य वेळेला घेणे.त्यामुळे शरिरात प्रतिकार शक्ती निर्माण होईल व रोगांना थारा मिळनार नाही ,हे पाहिजे तेवढे सोपे नाही .ज्यावेळेस हे तुम्ही करू शकणार तेव्हा सुगीचे दिवस आले म्हणून समजा.तसेच अन्न कसे खावे केव्हा खावे व काय खावे या गोष्टींच ज्ञान फार महत्वाचे आहे .हे ज्ञान मिळवणे व त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे सुगीचेच दिवस.जसं अन्न खाल तसं मन होईल.
      आता खाण्याबरोबरचं तुम्ही रोज काय वाचता .कोणता विचार करता  काय बघता .काय ऐकता व कोणाच्या संगतीत रोज असतात आणि काम काय करतात यावर तुमचे विचार अवलंबून असतात.जसे विचार करणार तशी कृती होणार .म्हणून ज्या विचाराने ज्या संगतीने तुमच्या मनाची चलबिचल होणार नाहि व मन शांत असणार ते विचार व संगत चांगली आहे असे समजा.हे सर्व असणे म्हणजे सुगीचे दिवस. वरील गोष्टी ज्या माणसाच्या आयुष्यांत असतील त्याच्या जीवनात पैसा संपती ही आपोआप येणार व नसतील तर आहे तो पैसा निघून जाणार .म्हणून प्रत्येकाच्या हातात आहे सुगीचे दिवस बघणे.असे दिवस बघणे म्हणजेच जीवन जगणे होय .तुमच्या आयुष्यात असले दिवस आले म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांमध्येही परिणाम होईल तेव्हा प्रयत्न करुया सुगीचे दिवस आणायचे .बघूया जमतं का आपल्याला

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...