सावली
जीवनात बरेच माणसे भेटतात व कायम सोबत असतात .सुख दुख:त बरोबर असतात म्हणून आपण म्हणतो की ते सावली सारखे सोबत असतात पण सावलीची बरोबरी आपण नाही करू शकत .जेवढी सावली आपल्या बरोबर असते तेवढे कुणिच बरोबर नसते .सावली सारखे असणारी माणसे कधी दूर जातील याची काही शाश्वती नाही.आपले स्वार्थ हेतू साध्य झाला की माणसे दूर पळतात.पण आपली सावली मात्र आपल्याशी कधीही गद्दारी करत नाही .कायम आपल्षा बरोबर राहून आपल्याशी प्रामाणिक असते पण तिच्याकडे आपण कधीही लक्ष देत नाही .बरेच वर्ष वर्ष आपण सावलीकडे कधी लक्ष देत नाही .ती आहे की नाही याचा थांगपत्ताही आपल्याला नसतो पण बिचारी शेवट पर्यंत ती आपल्या बरोबर असते .आपल्याला तिची किंमत नसते .मेल्यानंतरही ति आपला जसा आकार तसा आकार ती धारण करते .शरीराची राख झाली तरी त्या राखेची सावली दिसते.पाण्यात राख टाकल्यानंतर मग तिचे अस्तित्व संपते.
असेच काहींच्या नशिबात सावली सारखे माणसे असतात म्हणून आपण सावली सारखे दुर्लक्ष करू नये त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे व असे लोक खरेच भाग्यवान असतात .एक तरी माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असावा सावली सारखा किंवा आपण कुणाच्या सावली सारखे असावे कुणाच्या बरोबर की ज्याला आपली नितांत गरज असावी बघूया जमते का आपल्याला.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment