Skip to main content

कोणत्या गोष्टीला महत्व

महत्व कोणत्या गोष्टीचे

माणसाला कोणत्या गोष्टीला महत्व द्यावे हेच कळेनासे झाले पण जे जवळ आहे त्याकडे  त्याचे लक्षच नसते व त्याचे त्याला महत्वच समजत नाही म्हणजेच तो त्याकडे दुर्लक्ष करतो ऊदाहरण म्हणजे आपण जेव्हा निरोगी असतो तेव्हा आपले शरीराकडे महत्व नसतेव त्याकरिता खाणे व्यायाम योग  सवयी याकडे लक्षच नसते व त्याचे महत्वही वाटत नाही .जे दिसेल ते खात सुटतो मग कोणता आजार झाला व डाॅंक्टरने सांगितले की असे करा तसे करा मग त्याचे डोळे उघडतात .तेव्हा तो शरीराकडे लक्ष द्यायला लागतो तसेच घरात एखादी आपल्या प्रेमाची व्यक्ती असते पण त्याच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो त्याच्या किंवा तिच्या आवडी निवडी किती जपतो आपण .वेळोवेळी अपमान करतो आपण उलटसूलट बोलतो . पण ती घरातून किंवा आपल्या पासून लांब गेली तेव्हा तीचे महत्व कळायला लागते पण ती व्यक्ती कधीही परत येणार नसते मग त्या व्यक्तीच्या आठवणीने पश्चाताप येतो असं वागायला नको होते असं बोलायला नको होते पण वेळ निघून गेलेली असते व पश्चाताप करून काहीही उपयोग नसतो .पैसा असतो तेव्हा उधळपट्टी करतो व जेव्हा पैसे नसतात तेव्हा त्याची किंमत कळायला लागते .
       म्हणून सांगतो जे तुमच्या जवळ आहे त्याचा सन्मान करा. त्याला जपा त्यांचा आदर करा .अपशब्द वापरू नका .समजून घ्या त्याला किंवा तिला मग ते शरीर असो नाते असो पैसा असो किंवा कोणती वस्तू असो तिचे महत्व ओळखा व त्याचा मानसन्मान करा म्हणजे नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही व स्वताला अपराधीपणाची भावना येणार नाही .जे नाही त्यापेक्षा जे तुमच्या जवळ आहे आज त्याला महत्व द्या म्हणजे खरा आनंद होईल सर्वांना .बघा जमत  का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...