दुनिया एक रंगमंच
जग म्हणजे एक मोठा रंगमंच आहे व आपण सारे कलाकार.वेगवेगळ्या भूमिका निभावतो आपण.कधी मुलाची कधी बापाची कधी शिक्षकाची कधी नवर्याची कधी मित्राची कधी बाॅसची तर कधी कैद्याची चोराची आरोपीची कधी होतो पोलीस कधी गुन्हेगार .कधी न्यायाधीश कधी वकील .कधी होतो मजूर कधी मुकादम.कधी हांटेलचा मालक तर कधी कामगार.कधी होतो पंतप्रधान तर कधी मंत्री.कधी होतो देव तर कधी पुजारी.अशा अनेक भूमिका पार पाडतात माणसे .आपल्या वाटेला जी भूमिका आलीली आहे ती भूमिका बरेच जण चांगल्या प्रकारे पार पाडतात पण काही मात्र भूमिका करण्यात चुकतात .काही जिंकतात तर काही हारतात. जे हारतात ते विसरतात की हा रंगमंच आहे व आपण कलाकार .आपली भूमिका संपली की एक एक पात्र ह्या रंगमंचावरून गायब होते व त्याची जागा नवीन कलाकार घेतात व हा show असाच अहोरात्र चालूच असतो .भूमिका करताना आपण एवढे एकरूप होतो की आपण स्वता कोण आहोत हेच विसरतो व तीच भूमिका खरी मानून सुखदुखाचा अनुभव घेतो व स्वताला पूर्ण विसरतो .
आपल्या वाटेला कोणत्या दिवशी कोणती भूमिका येईल हे सांगणे कठिण .उद्या आॅफिसला जावून बाॅसची भूमिका करणार असतो पण अचानक रात्री ताप येतो व पेशंटची भूमिका पार पाडावी लागते. काहीवेळेस स्वताच्या मुलीचे लग्न असते उद्या व कन्यादानाची भूमिका पार पाडायची असते व अचानक हार्टअॅटक येतो व कन्यादान ऐवजी मरणाची भूमिका पार पाडावी लागते .म्हणून चिंता न करता जी काही भूमिका आपल्या वाटेला येईल ती चांगल्या प्रकारे पार पाडावी पण त्या भूमिका पेक्षा आपण वेगळे आहोत ही जाणीव असावी त्यामुळे भूमिका करताना जे काही सुख व दुख येईल त्याचा खोलवर आपल्यावर परिणाम होणार नाही व त्यातून बाहेर पडणे सोपे जाईल .बघा जमत का असा विचार करून
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment