🌹🌹 घर 🌹🌹
बर्याच वेळा घर दिसायला फार सुंदर दिसतं .सर्व बाजूंनी सजवलेले आकर्षक पेंटींग सोपा पडदे कपाटे सर्वांना वेगळी रूम उंच दर्जाचे फर्निचर शोभेच्या वस्तु आरामदायी खूर्चि भारीतले भारी कपडे महागड्या गाड्या .श्रीमंतीचे सारे लक्षणे .हे सर्व बाहेरून दिसणारे डुप्लिकेट सौदर्य .हे सारे बघून बाहेरच्या कोणत्याही माणसाला हेवा वाटेल पण
त्या घरात असणारी माणसांचे काय .एकमेकांना द्यायला वेळ नाही.मनातले कोणतीही गोष्ट सांगत नाही .मनातल्या मनात कुढतात .आईवडिलांना मुलांशी बोलायला वेळ नाही .त्यांचे शाळेत काय चालू आहे हे बघायला वेळ नाही .फक्त पैसे फेकले ट्यूशनला की त्यांचे कर्तव्य संपले .आपआपल्या कामात सर्व बिझी.बाईला कामाला ठेवून तिच्पा हाताचा स्वयंपाक खाणार.एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवायला वेळ नाही किंवा वेळ असला तरी बनवण्याची ईच्छा नाही पण पैसा कमवतात खोर्याने का व कशासाठी हेच कळत नाही .क्षुल्लक गोष्टीवरून भांडतात एकमेकांना शिव्या लाखोली वाहतात .मुलांनाही मारझोड करतात म्हणून मूलेही दडपणाखाली वावरतात .पती बायकोचा mobile तपासतो वापत्नी नवर्याचा mobile तपासते .एकमेकांबद्यल विश्वास नाही .मग हे सारे भौतिक सुख काय कामाचे? मुलांचा नंबर शाळेत शेवटी .याउलट
काही घरांमध्ये कोणत्याही सूख सुविधा नसतात .एकच रूम असते .खाणे साधे असते उंच दर्जाचे कपडे नसतात.घरात कोणत्या वस्तू नसतात .मोजकेच पैसे असतात पण एकमेकांबद्यल प्रेम असते जिव्हाळा असतो विचारपूस असते भविष्याचे स्वप्न असतात .संध्याकाळी एकत्र जेवतात .दिवसभर काय काय केले याची चर्चा करतात .एकमेकांना मदत करतात .घरचेच जेवण करतात .बाहेरून कोणतेही पदार्थ खात नाहीत .एकएक पैशाची किंमत असते त्यांना .अभ्यास केल्याशिवाय आपण प्रगती करणार नाही ही जाणीव असते.स्वप्रेरणेने ते अभ्यास करतात त्यांना सांगायची गरज नसते .घर हेच विश्व असते त्यांचे .घरात कधीही भांडणे नसतात एकमेकांना समजून घेतात .अशा घरात शांती येवून राहते व असे घर म्हणजे नंदनवनच असते .भौतिक गोष्टी नसल्या तरी चालतील पण असे आदर्श घर असावे आणि यालाच घर म्हणतात .तुम्हिच ठरवा तुमचे घर आहे की फक्त भौतिक गोष्टींचा देखावा .
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई
Comments
Post a Comment