Skip to main content

सुट्या

सुट्या

शाळा काॅलेजला आता सुट्या लागलेल्या आहेत सर्वजण मजेत आहेत प्रत्येकजण नियोजन करता आहेत कुठे जाण्याचे .काहीतर झोपण्याचा आनंद घेता आहेत काही फिरण्याचा तर काही खाण्याचा आनंद घेत आहेत .कुणी वाचण्यात गूंग आहेत तर कुणी माॅर्निंग वाॅक करण्यात काहीना त्या आॅफिसच्या आठवणी काढायच्या नसतात तर काही त्या आठवणीमध्ये मग्न आहेत .काहींना मुला मुलीचे लग्न करायचं आहे तर काहीना वजन कमी करायचं आहे.काहीना मनोसक्त खेळायचे आहे.अभ्यास सोडून सर्व काही करायचं असते .काही पिंचर नाटके बघण्याचे नियोजन करतात.
      काहीही करा पण सुट्टीमध्ये जगणं शिकले पाहिजे मनासारख्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत सुट्टीमध्येअशी मानसिक स्थिती निर्माण झाली पाहिजे की ती सुट्टीनंतर उपयोगाला येईल.जूनमध्ये कामासाठी प्रेरणा आली पाहिजे.सर्व वाईट अनुभव पुसता आले पाहिजेत व मनाची पाटी कोरी झाली पाहिजे व त्यावर सुट्टीत चांगलं लिहिलं गेले पाहिजे.सुट्टीचा उपयोग चांगला झाला पाहिजे असं मनापासून ठरवलं पाहिजे नाहीतर सुट्या अशा आल्या तशा जातील म्हणून मनोसक्त जगा व आवडीचेकामं करा .जे भेटले नाहीत त्यांना भेटा .स्वतासाठी थोडं जगून बघा .काहीवेळा तासनतास डोळे मिटून शांतीचा अनूभव घ्या . जे जे जमेल ते ते करण्याचा प्रयत्न करा.बघूया किती जमतं ते

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...