Skip to main content

एक अनुत्तरीत सवाल

अनूत्तरीत सवाल

मला एक प्रश्न सतत सतावतो असतो की चांगल्या माणसाबरोबर नियती असा खेळ का करते .आपण जर बघितले तर लक्षात येईल काही उदाहरणांवरून.ज्ञानेश्वर महाराजांचे सर्व भावंड .सर्व संत हे कमी वयातच ह्या जगातून निघून गेले.तसेच अनेक इतर महान लोकांच्या बाबतीत पण तेच झाले.लालबहाद्दूर शास्री हेपण ऐन उमेदीत गेले .पंडीत नेहरू सारखे लोकही लवकर गेलेत .स्वामी विवेकानंद रामाणूजन सारख्या लोकांनाही आयूष्य फार लाभले नाही.शिवाजी महाराज  हे ही लवकर गेलेत .असेचांगले लोकांना आयूष्य का जास्त नसते व ज्यांचा उपयोग समाजाला नसतो त्यांना भरपूर आयूष्य .ज्या ज्या लोकांनी महान कार्य केले त्याच्या बाबतीत नियतीने  अन्यायचं केला .आंबेडकरांनी किती महान कार्य केले पण त्यांनाही फार आयुष्य  लाभले नाही.असे अनेक उदाहरणे आहेत की चांगल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतात .तुमच्याही अवतीभोवती बघा तुम्हालाही दिसेल की चांगले लोकांच्या बाबतीत  हे घडलेले दिसेल तसेच ज्या लोकांकडे भरपूर संपत्ती असते त्यांना मुले होत नाहीत व ज्यांना पोट भरायची मारामार असते त्यांना मात्र मुलेच मुलेच असं अजब गणित आहे नियतीचं..असे का ?उत्तर मिळणे अवघड
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...