Skip to main content

नियतीचा अजीब खेळ

नियतीचा अजीब खेळ

समाजात नियतीचा अजीब खेळाबद्यल आज काही सांगतो तुम्हाला.एका माणसाला साप पकडण्याचे फारचं कौशल्य अनेक विषारी साप पकडलेत पण त्याचा शेवट मात्र सापाच्या डंकाने झाला .पेपर मध्ये आपण वाचले असेल समूद्रामध्ये एकाला मगर मोठे मोठे मासे यांच्याशी खेळायला आवडायचे व त्यात त्याचा हातखंडा होता पण एका माशाच्या शेपटाच्या मारामूळे तो मरण पावला.नितिन मांडके सारख्या डाॅंक्टरांनी अनेक ह्यदयाच्या शस्रक्रिया केल्या .अनेक हार्ट अॅंटेक वाल्यांचे प्राण वाचवले पण त्यांचा मृत्यू हार्ट अॅंटेकनेच व्हावा याला काय म्हणायचे .आजची बातमी वाचली असेल अश्विन सूंदर यांनी अनेक कार रेसिंग जिंकल्या आणि त्यांची कार झाडाला आदळून त्यांना बाहेरच पडता आले नाही व कारने पेट घेतला व पत्नीसह होरपोळून मरण पावले वा वा रे नियतीचा खेळ.कल्पना चावला अंतराळामध्ये तिने किती तरी दिवस घालवले व शेवट तिथेच व्हावा.
           आई मुलांना कष्ट करून मोठे बनवते व मुलगा जेव्हा प्रगती पथावर चढणार तेव्हाच तिचा मृत्यू व्हावा व मुलाला जन्मभर ती सल टोचत राहणार असा अनूभव बर्‍याच लोकांना आला आहे किंवा वडील मूलाला मोठे बघायचे स्वप्न बघतात व मुलगा मोठ्या पदावर नियूक्त होतो पण त्याआधीच त्यांचा मृत्यू होतो .शिवाजी महाराजांना राजा बनवण्यासाठी जिजाऊने त्यांना घडवले व ते राजे झालेपण सात आठ दिवसांनी जिजाऊंनी जगाचा निरोप घेतला तेव्हा राजांनाकिती वेदना झाल्या असतील असे कितीतरी उदाहरणे आहेत,एक मुलगा आई साठी कष्ट करतो व मोठ्या पदावर नोकरीला लागतो आईला वाटते आता मी धन्य झाले पण त्या मुलाचाच मृत्यू होतो व आई अनाथ होते .जेथे गरीबी आहे तेथील लोकांना गंभीर आजार व जेथे अमाप पैसा तेथे आरोग्य चांगले.जो माणूस शांत त्याची बायको कजाक व जी शांत तिचा नवरा भांडखोर असे विषम चित्र बघायला मिळते
        असे का होते .नियती मुद्दाम खेळ खेळते का? कोणीतरी मुद्दाम घडवून आणते का? तिला संदेश द्यायचा असेल की मी सर्वांची बाप आहे माझ्यापुढे कुणीही जाऊ शकत नाही .विचार करायला लावणारा प्रश्न आहे .जमलंच तर विचार करा असे का घडते योगायोग एवढा  नक्कीच होऊ शकत नाही .बघा विचार करा .

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...