Skip to main content

वारी

🌹🌹वारी🌹🌹
वारी वारी जन्म मरणाते वारी।
हारी पडलो आता संसारी।।

जातात दरवर्षी वारकरी वारीला।
भेटतात आपले दैवत विठ्ठलाला।।

वारीत विसरतात आपले देहभान।
करतात पवित्र देह आणि मन।।

एकमेक लहान थोरांच्या पाया पडतात।
अन भेदाभेद विसरायला भाग पाडतात।।

भजन किर्तन नामस्मरण होते सदा।
त्यासाठी करावी वारी एकदा।।

वारीने विसरतात संसारातील चिंता।
एकच ध्यान त्याचे नाव अनंता।

विठ्ठलाच्या भेटीपूर्वी करतात स्वताला पवित्र।
त्यासाठी घेतात कष्ट अहोरात्र।।

खर्‍या वारकर्‍यांमध्ये बदल होतो वारीने।
पण हौशी गवशे नवश्यात नाही बदल होतो एका काडीने।।

भेदाभेद असतो वारीत अमंगळ।
गर्वाच्या बाता करण्यात नसतो वेळ।।

आनंद व सुखासाठी करीशी तळमळ।
जाय विठ्ठलाच्या भेटीला एकवेळ।।

विठ्ठल विठ्ठल असा करावा जप।
नाही करावसं वाटणार कोणते पापं।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...