काॅपी
सध्या सर्वकडे हिचे अस्तित्व दिसते आहे .उठसूठ सर्वांचे डोळे हिच्याकडे लागलेले असतात .खरे मेहनत घेणारे मुले हिच्याकडे ढूंकूनही बघत नसतात पण बरेच जण हिच्या आधाराने पुढे जात असतात तिला लपविण्यासाठी वेगवेगळा मार्ग शोधून काढतात.तो मार्ग शोधण्यासाठी तासनतास वेळ कढणार पण अभ्यासाठी नाही .नको त्या ठिकाणी तिला लपवतात .तिला जपतात व तिच्या आधाराने प्रगतीपथावर जाण्याचा प्रयत्न करतात.शिक्षकांचा डोळा चुकवून मुलांचे लक्ष असते तिच्याकडे .नाहीतर याचा पेपर बघ त्याचा बघ .काहीही करून अभ्यास न करता त्यांना पास व्हायचं असते.काही ठिकाणी तर शिक्षकचं मदत करतात मुलांना कारण शाळेचा काॅलेजचा निकाल चांगला लागावा यासाठी झटत असतात स्वताचा प्रामाणाकपणा बाजूला ठेवून मुलांना पास होण्यासाठी मदत करतात .अशी काॅपी करून कुठेपर्यंत मुले जाणार व गेलीच तर पुढे काय आदर्श निर्माण करणार फक्त पगार मिळाला की बस झालं .त्यांना त्याचे काहीही वाटतं नाही.विद्यार्थीने काहीही न करता शिक्षकचं प्रात्यक्षिक परीक्षेला भरघोस मार्कस देतात . मुख्य म्हणजे प्रात्यक्षिक परिक्षेला कुणीच नापास होत नाहीत पण theory पेपरमध्ये शून्य पण मार्कस मिळतात .काहीवेळेस प्रात्यक्षिक परीक्षेत पूर्ण मार्कस असतात व theory मध्ये शून्य असतात किती विरौधाभास आहे हा .शिक्षणाचा बाजार मांडला आहे सारा असे करून नवीन चांगली पिढी कशी निर्माण होणार व ह्या देशाला चांगले नागरिक कसे मिळणार आणि देशाचं काय होणार .बिगर कष्ट करून पुढे जायचं असते बर्याच जणांना . विचार करा व काॅपीला प्रोसाहन देत असाल तर कृपया थांबवा .आपले कर्तव्य चांगल्या पध्दतीने करा .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई
Comments
Post a Comment