भीती
भीती हा प्रकार कुणाला नवीन नाही .प्रत्येकाच्या आयुष्यांत भीती ही कोणत्या ना कोणत्या रूपात येतेच.लहाणपणी खेळताना जास्त वेळ झाला म्हणून आईबाबांची भीती वाटायची.शाळेत कमी मार्कस मिळाले म्हणून घरचे काय म्हणतील याची भीती वाटायची जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी भीती चे स्वरूप बदलत जाते.शिक्षणासाठी बाहेर राहण्याची वेळ येते तेव्हाभीती वाटायची.घरात एकटं रात्री राहण्याची भीती वाटायची.शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळेल की नाही याची भीती वाटायची कारण मुलाखतीला काय विचारतील याची भीती वाटायची.नोकरी मिळाल्यावर तेथे कसेहोईल आपला निभाव लागेल का याची भीती वाटायची मग लग्न करताना कशी असेल मुलगी ती सामावून घेईल का याचीभीती.घरी वेळेवर आपला सवंगडी किंवा घरचे सदस्य नाही आले तर भीती वाटते.बाॅसने कॅबिन मध्ये बोलावले तर भीतीचा डोंगर उभा राहतो .आपण वेळेवर नाही कामावर पोहोचलो तर भीती निर्माण होते.कामावर चूक झाली तर भीती वाटायला लागते.मुले आजारी पडले तर भीती उभी राहते.घरी रात्री एकटं असल्यावर बेल वाजली की भीतीची पाल चूकचूकते.आपल्या हातून अपघात झाला तर भीतीमुळे रात्रभर झोप येत नाही.नोकरी जाण्याची भीती आजाराची भीती कोण काय म्हणेल ती भीती अशा अनेक भीतीखाली आपण जगतो
आणि ह्या भीतीमुळे आपल्यातला आत्मविश्वास कोलमोडतो .स्वतावरचा विश्वास उडतो.भीतीमुळे कोणतेही काम धड होत नाही.भीतीमुळे मन कायम अशांत राहते.भीतीमुळे प्रगती खूंटते.काहीवेळा भीतीमुळे अंग थरथर कापायला लागते.काही भीती तर एवढी जबरदस्त असते की हार्टअॅटेक येतो व माणूस जातो .भीतीमुळे नैराश्य येते.भीतीमुळे काहीजण जीवन संपवतात.भीतीमुळे समोरचा काय बोलतो त्याकडे लक्षचं नसते.ह्रदयाचे ठोके वाढतात.गाडी असो की घर भीतीमुळे चालवू शकत नाही.
भीतीयूक्त जीवन जगणे म्हणजे खरे जीवन जगणे.ज्याला कोणतीच भीती नाही तो माणूस खरा सुखी.काही भीती स्वताच्या संकूचित विचाराने येते. काही भीती स्वताच्या कर्माने ओढून घेतो .नियोजन नसल्यामुळे भीती ओढून घेतली जाते.आळस पणाने बर्याच गोष्टी केल्या जात नाहीत म्हणून ती गोष्ट झाली नसल्याने भीती निर्माण होते.आपल्याच न्युनगंडाने भीती निर्माण होते.जीवन छान जगायचं असेल तर भीती मनातून काढून टाका किंवा असे काम करू नका की ज्यामूळे तुम्हाला भीती वाटेल.काही भीती काढणे अशक्य असते तेव्हा ती सहन करण्याची क्षमता वाढवा.बघा भीतीला लांब ठेवणे जमतं का? चला प्रयत्न करू व आनंदी जीवन जगू.
प्रा. दगा देवरे

Comments
Post a Comment