मोबाइल आणि आजचा तरूण
आज प्रत्येकाकडे मोबाइल दिसतो व तोही नेट सहित .त्यामूळे अभ्यासाशिवाय त्यांना भरपूर वेळ मिळतो बघण्यासाठी .जे बघू नये ते सर्व उपलब्ध झाले आहे मोबाइल मध्ये त्यामूळे आजची तरूण पिढी वाया चालली आहे त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडाले आहे .अभ्यास त्यांना करावासाच वाटत नाही .परिक्षा आली की मग थोड काहीतरी वाचायचे संधी मिळाली की याचे बघ त्याचे बघ .लाज हाप्रकारच राहिला नाही लहान वयापासूनच आईवडिल त्यांना मोबाइल घेवून देतात व जे घेवून देत नाही ते पण आपल्या मित्रांचा मोबाइल बघतात व सर्व वेळ त्यातच घालवतात .कुठे कुठे लक्ष ठेवणार .श्रीमंताच्या मुलांना वेगळी रूम असते अभ्यासाला पण ते रात्री जागूण काय बघतात याचा त्याच्या घरच्यांना थांगपत्ता पण नसतो .मोबाइल मध्ये रात्री 2ते3 वाजेपर्यंत जागतात मग झोप अपूर्ण होते .भूक लागत नाही .कुठे फिरायला आवडत नाही .कोणत्या नातेवाईकांकडे जायला नको .मैदानी खेळ बंद पडलेत .एका रूम मध्ये बसून तासनतास मोबाइल मध्ये गेम पिंचर अजून बरेच काही बघत बसायचे .झोपेचे टाईमटेबल नाही खाण्याचे नाही .खातांना पण मोबाइल बघायचा .काय खातो त्याकडे लक्ष नाही .कुणाकडे जरी गेलोत तरी फक्त मोबाइल बघायचा कुणाशी बोलायचे नाही .भविष्याची चिंता नाही.मोबाइल मूळे लहान वयातच एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते.आईवडिलांशी बोलायला त्यांना वेळ नसतो .परिक्षा कधी असते ते भान नसते .
त्यामूळे या पिढीची फार चिंता आहे काय होईल या देशाचे .तरूण पिढी समोर कुणाचेच आदर्श नको आहेत .त्यांना वाचायला आवडत नाही .फक्त मोबाइल आणि मोबाइल .ते जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा आईवडिल जबाबदार आहेत कारण त्यांना मुले काय करतात ते बघायला वेळ नाही .काही आईवडिलांना मुलांपेक्षा मोबाइलचे वेड जास्त असते वते मुले बघत असतात साहजिकच त्यांना वाटते आपणही बघायला पाहिजे.आंघोळ करताना देवाने नाव नको असते पण मोबाइलमध्ये विचित्र गाणे लावून आंघोळ साठी टाईम पास करायचा .ह्या मोबाइल मूळे त्यांचा मेंदू बधिर झाला आहे. हा प्रकार कंट्रोल करणे फार अवघड .चांगला वापर केला तर मोबाइल हा ज्ञानाचे भांडार आहे व मित्रही पण त्याचा वापर तसा कितीजण करतात म्हणून प्रत्येकाने विचार करायची वेळ आली आहे. मुलिंनाही स्वयंपाक शिकणे जमत नाही काही करता येत नाही .मुले किंवा मुली यांना घरात आईवडिलांना मदत करायला नको पण चॅटिंगसाठी भरपूर वेळ असतो .त्यांना आॅनलाईन शाॅपिंग साठी मोबाइल हवा असतो पण अभ्यासा साठीमोबाइल वापर करायचा हेच फक्त त्यांना जमत नाही काय व कसे होइल अशा तरूणांचे विचार गंभीरपणे करायची वेळ आली आहे .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment